घुग्घुस-वणी राज्य महामार्गाच्या पुलावरुन एकेरी वाहतुक सुरु

283

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
दिनांक २२ जुन पासुन रात्री दरम्यान घुग्घुस-वणी राज्य महामार्गावरील पुल सर्व वाहनाकरीता बंद करण्यात आला होता मात्र हा पुल फक्त दुचाकी वाहना चे आवागमन सुरु होते.
घुग्घुस-वणी राज्य महामार्गावरील वर्धा नदीचा पुल जिर्ण अवस्थेत असल्याने नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या सिमेलगत वणी क्षेत्राच्या वेकोलीच्या कोळसा खाणी आहे व याच पुलावरुन हायवा ट्रक द्वारे कोळश्याची वाहतुक केली जाते .राज्य महामार्ग क्रमांक ७ ला जोडणारा हा पुल असल्याने मुंबई, पुणे, अकोला, अमरावती, नांदेड़, परभणी व यवतमाळ या जिल्हात ये-जा करण्यासाठी वाहनांना पुलावरुन जावे लागते त्यामुळे य्या पुलावर वाहनांची मोठी वर्दळ असते.
वणी ते घुग्घूस रस्त्यावरील वर्धा नदिच्या पुलाचे डागडुजी व बेअरिंग रिपेयरिंग चे काम करणे असल्याने व सदरचे काम संपूर्ण वाहतुक बंद केल्याखेरीज करणे शक्य नसल्याने कार्यकारी अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग -१ , चंद्रपूर यांनी सदर रस्त्याची वाहतुक बंद करुन पर्यायी रस्त्याने वळविण्याबाबत विनंती केली होती.
जनतेला त्रास व असुविधा होवु नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता घुग्घूस- वणी रस्ता बंद करुन पर्यायी मार्ग निश्चित करणे आवश्यक होते . त्यामुळे डॉ . महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम -१ ९ ५१ च्या कलम -३३ ( १ ) ( ब ) अन्वये कायदेशिर अधिकारान्वये जनतेला धोका , अडथळा किंवा गैरसोय होवु नये तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होवु नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता प्रमुख राज्य मार्ग क्रमांक १४ घुग्घूस- वणी मार्गावरील वर्धा नदिच्या पुलाचे काम करणे असल्याने सदरचा रस्ता दि . २२/०६/२० पासुन ३० दिवसांकरीता सर्व प्रकारच्या वाहनांना रहदारीस बंद करण्यात आला होता.
पुलाच्या रिपेरिंग चे काम एका बाजूस पूर्ण झाल्याने २२ जुलै पासुन एकेरी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. तीन कोटी रुपये खर्च करुन दुरुस्तीचे काम सुरु आहे. चंद्रपुर व यवतमाळ या दोन जिल्ह्याच्या सिमेला जोडनारा सदर पुल आहे. परंतु पुलावरील कठडे तुटलेल्या अवस्थेत आहे त्याठिकाणी बांबु बांधुन आहेत. तसेच दुस-या बाजुची दुरुस्ती केल्या जात आहे. एकेरी वाहतुक सुरु असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यावेळी घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी पुलावरील कठडे तुटुन असल्याने सावधगीरीने प्रवास करावा व आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे असे आव्हान केले आहे.