Home महाराष्ट्र शहरातील 263 कोरोना कंटेन्टमेंट झोनचा ढिसाळ कारभार थांबेना.

शहरातील 263 कोरोना कंटेन्टमेंट झोनचा ढिसाळ कारभार थांबेना.

146

 

सिद्धेश्वर वामनराव कुलकर्णी कार्यकारी संपादक लातूर
मो. 7666462744
दखल न्युज/दखल न्युज भारत

लातूर शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे शहरातील बहुतांश नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत अाहेत शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे त्यामुळे महापालिकेच्या वतीने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 263 कोरोना कंटेन्टमेंट झोन उभारलेले आहे परंतु याकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे शहरातील कंटेन्टमेंट झोनचा ढिसाळ कारभार समोर आल्याचे वास्तव चित्र शहरातील विविध भागात दिसून येत आहे कोरोनाबाबत मनपा गांभीर्याने घेत नसल्याने शहरातील बहुतांश नागरिक कायम भीतीच्या सावटाखाली आहेत त्यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूर महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौरांनी या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे देश राज्याबरोबरच लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे त्या त्या भागातील रूग्णांची संख्या नियंत्रणात रहावी यासाठी कोरोनाग्रस्त रूग्ण निघेल त्या भागात कंटेन्टमेंट झोन उभारण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात कंटेन्टमेंट झोन उभारण्याचा दर्जा चांगला होता परंतु आता मात्र कुठल्याही लग्न समारंभाचे थातूर मातूर टेंट उभारून रूग्णांची सेवा केल्याचे दाखविले जात आहे परंतु यामुळे कंटेन्टमेंट झोनचा ढिसाळ कारभार समोर आला असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता लातूर महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौरांनी लातूरकरांच्या आरोग्यासाठी कंटेन्टमेंट झोनचा दर्जा सुधारावा, अशी मागणी शंकरपुरम् नगर, मजगे नगर, माताजी नगर या भागातील नागरिकांतून केली जात आहे दर्जा नसेल तर कंटेन्टमेंट झोन उभारण्याची गरज काय शहरातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे परंतु रूग्ण संख्या कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कंटेन्टमेंट झोनचा दर्जा कायम ठेवला जात नाही त्यामुळे शंकरपुरम् नगर, मजगे नगर माताजी नगर या भागातील नागरिकांनी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांच्याकडे समस्या मांडली असता त्यांनी या भागातील कंटेन्टमेंट झोनची पाहणी केली दरम्यान त्यांना लातूर महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार दिसून आला शहरात रूग्ण संख्या वाढत असताना त्यांची काळजी घेण्याऐवजी दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे रूग्णांच्या आरोग्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कंटेन्टमेंट झोनचा दर्जाच नसेल तर कंटेन्टमेंट झोन उभारण्याची गरज काय असा सवाल भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी उपस्थित केला.

Previous articleकोरोनाच्या संकट काळात व्यावसायिक व सामाजिक जीवन सुलभ करा चंद्रपूर मेडिकोज असोसिएशन द्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली मागणी
Next articleप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा क्रमांक 3 चे संपूर्ण लातूर जिल्हा भारतील प्रस्ताव युद्ध पातळीवर तयार करून केंद्र सरकारकडे सादर करत आहोत अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली.