घाटकोपर मध्ये गणेश विसर्जनासाठी आचार्य अत्रे मैदान व घाटकोपर डेपो जवळ बनणार कृत्रिम तलाव : नगरसेविका राखी जाधव

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : काही दिवसांवर गणेशोत्सव येत असल्याने अनेक मंडळे आणि घरगुती गणपती साठी सर्व कामाला लागले आहे. सरकारने गणपती मूर्ती ही छोटी असावी असे आवाहनही केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात खूप असी गर्दी मुंबईत होत असते त्यातच कोरोना विषाणूचे संकट असल्या कारणाने सोशल डिस्टन्सिंग पाळता यावे तसेच अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी घाटकोपरमध्येच कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार असल्याने आता गणेशभक्तांना गणेश विसर्जनासाठी भांडूप, पवई, जुहू चौपाटी, शीतल तलाव किंवा गिरगाव चौपाटी याठिकाणी जावे लागणार नाही तसेच भाविकांची गर्दी टाळण्यास मदत होऊ शकेल.नगरसेविका राखी जाधव यांनी घाटकोपरच्या आचार्य अत्रे मैदानात कुठल्या ठिकाणी किती मोठा कृत्रिम तलाव बनवायचा याबाबतची पाहणी आज सहाय्यक आयुक्त आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह केली.
घाटकोपर डेपोच्या जवळ म्हणजेच पूर्व द्रुतगती मार्ग याठिकाणीही कृत्रिम तलाव बनवण्यात येणार आहे. ही मागणीही त्यांनी केली होती. तीदेखील मान्य करण्यात आली आहे.