स्वराज्य शिक्षक संघ व स्वामी विवेकानंद समाज विकास संस्थेच्या वतीने कोविंड स्वराज्य समाजरक्षक पुरस्काराने सोलापूर जिल्ह्यातील अनेकांचा गौरव…

 

सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी // ऋषीकेश

संपूर्ण जगात बरोबरच भारत देशामध्ये कोरोना covid-19 या महाभयंकर अशा वायरस ने धुमाकूळ घातलेला असताना व त्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेले असताना एक आपली सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीब वंचित व समाजाला मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व कोरोना महामारी पासून बचाव करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व समाज रक्षकांना स्वराज्य शिक्षक संघाने स्वामी विवेकानंद समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हिड स्वराज्य समाजरक्षक पुरस्कार २०२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस विभागामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पंढरपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे, सामाजिक बांधिलकी जपत सर्व गोरगरीब व वंचित कुटुंबांना लॉक डाऊन च्या काळात सर्वतोपरी मदत करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस व शाॅडो कॅबिनेट मंत्री दिलीप (बापू) धोत्रे, त्याचप्रमाणे छावा क्रंतिविर सेनेचे सागर भरत साळुंखे, सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारितेमध्ये आपला ठसा उमटवलेले प्रसाद कुलकर्णी या सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये जातीपातीच्या पलीकडे जाऊन महा संकटामध्ये आपले काम हेच धर्म आहे या कर्तव्यभावनेने झोकून देऊन काम केले आहे त्याबद्दल या संस्थेचे प्रदेशाध्यक्ष मा श्री फत्तेसिंह पवार साहेब, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद समाज विकास संस्थेचे अध्यक्ष तुकाराम पाटील साहेब (पत्रकार), व डॉ सौ. स्मिता गिरी मॅडम, व दोन्ही संस्थेच्या इतर सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी हे सन्मानपत्र वरील सर्व योध्दांना सन्मानाने प्रदान केले आहे.
या सन्मान पत्रा साठी सर्व समाज रक्षकांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.