कत्तलसाठी नेत गाई तवेरा सह नहरात पडुन पाच ही गोवंश मृत ,ड्रायवर फरार

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी (ता प्र)
पारशिवनी तालुक्यातील गाव भगिमहारी याला जोडणारा करंभाड – भागिमहारी रस्त्यावरील पुलावरुन गायी वाहतूक करणारी गाडी २४ जुलै रोजी पेंच कालव्यात पडून पाच गायी म्रुत्यु पडल्यात.
पारशिवनी तालुक्यातील भागिमहारी या गावाला जोडणारा करंभाड – भागिमहारी रस्ता असून सदर सदर रस्त्यावरून पेंच कोराडी कालवा गेल्याने या रस्त्यावर पेंच सिंचन विभागाचा जूना पुल असून नादुरुस्त आहे. केव्हा खचून पडेल नेम नाही. हाच मुख्य मार्ग असल्याने याच पुलावरुन दळणवळण सुरू आहे. गावकरी व परिसरातील नागरिक यांना जाण्या येण्यासाठी याच रस्त्यावरील पेंच कोराडी कालव्यावर शासनाच्या जलसंपदा विभागाकडून अनेक वर्षापूर्वी बांधकाम केले होते अशा पुलावर दोन्ही बाजूंनी कठडे नाहीत. आणि पुल नादुरुस्त असल्याने त्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरणारे आहे. मात्र अजूनही पुल नादुरुस्त असून पुलावर खडडे पडले आहेत. वारंवार बांधकामाची मागणी करुनही याकडे संबंधित अधिकारी चे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिकांडून होत आहे.त्यामुळे २३जुलै च्या रात्रीच्या पहाटे दोन वाजताच्या सुमारास चारचाकी तवेरा गाडी क्र.एम.एच.३१ – ५२९५ ही करंभाड दिशेने पाच गायी भरून जात होती.गोवंश जनावरे चे पाय डोरीने ने बाधुन त्या गायी कत्तलीसाठी कामठी येथे नेत असल्याचा अंदाज आहे. अशावेळी रात्री अंधार असल्याने हा पुलावर खड्डे व पाणी साचले असल्याने हा रस्ता दिसून आला नसावा तवेरा चे डायहर ने निष्काळजी पणाने चालवत नहरात पङली त्यामुळे तोल बिघडले आणि गाडी पुलाखाली कालव्यात पडली. गायी बांधून असल्याने पाच गायी म्रुत्यु पडल्या मात्र गाडी चालक येथून पसार झाला आहे. सदर घटनेची माहिती पारशिवनी पोलीसात देताच पोलिस उपनिरिक्षक पि जी पळनाते स्टाप सह घटनास्थळी पोहोचले. घटना ची सहनिशा करून दोन पंचाचे सहायने जप्त करून पाच ही गाई किमत ५०,हजार गाडी २लाख असे एकुण २,५०,०००चा माल जत्त करून गोवंश जनावराना पशु धन विकास अधिकारी यांना पत्र व्यहार करून पशु वैद्यकिय अधिकारी डाक्टर लोखंडे यांने पाच ही ग़ोवंशाचा शव विच्छेदन करून जवळ घटना स्थळी जवळ शेजारी दफन बिधी करण्यात आली आणी पाच ही गोवंश जानवराचे कारणी भुत झाल्याने चालाक मालक विरूध भा द वी कलम२७९,४२७,४२९ सह प्रा०याना क्रुरतेने बागविण्यास प्रनिबध कराणया बाबत अधिनियम १९६० कलम ११(१) (घ),(ङ),(च)सह महाराब्ट प्राणी सरक्षण अधिनियम १९७६ कलम((१),(२),,५(ब) सह महाराब्टन पोलिस अधिनियाम १९५१नुसार कलम ११९सह मोटार वाहन कायदा आधिनियम १९८८कलम १७७,१८३,१८३, अन्वये अज्ञात वाहन चालक विरुध गुन्हा नोदवुन व्यानेदार विलास चौहान यांचे मार्गदर्शनात पोलिस उप निरिक्षक ज्ञानबा पळनाते पुढील कार्यवाही करून अज्ञान व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहे.