सावली तालुक्यातील ग्रामपंचायत निकालात कांग्रेस 27भाजपा 18 व संमिश्र 5

0
52

सुधाकर दुधे
सावली -(तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील 50 ग्रामपंचायत पैकी आकापूर अविरोध असल्याने प्रत्यक्षात मात्र 49ग्रामपंचायत निवडणूक झाले
असता 420 सदस्यासाठी निवडणूक घ
घेण्यात आली मात्र अनेक ग्रामपंचायत मध्ये एकूण 76 सदस्य अविरोध निवडून आल्याने प्रत्यक्षात 344सदस्यासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत आज तहसील कार्यलायात सकाळी 10 वाजेपासुन लागलेला कार्यक्रमात एकूण ग्रामपंचायत पैकी 27
कांग्रेस भाजपा 18 संमिश्र5 ने बाजी मारलेली आहे.मात्र सरपंच पदाच्या निवडणुकीत पुन्हा फेरबदल होवू शकते असेही चित्र दिसत आहे.सावली तालुक्यातील आज निवडून आलेले सदस्य संख्या ही कांग्रेस ची जास्त सदस्य विजयी झाले आहे.तर त्या पाठोपाठ भाजपा चे सदस्य व अपक्ष व इत्तर गटाचे 23 जण निवडून आलेले आहे.सकाळी 10 वाजेपासुन मत मोजनी ला सूरूवात करण्यात आली व दुपारी 2:30 वाजेपर्यंत पूर्ण झाली. यावेळी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला होता