पोलीस आयुक्त कार्यालय; शांतता कमिटी सदस्य पदी यशवंत पवार यांची दुसऱ्यांदा निवड

 

सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी // ऋषीकेश

शहरातील सामाजिक सलोखा शांतता, तसेच साजरे केले जाणारे वेगवेगळे उत्सव बाबत यशवंत पवार यांनी पोलीस आयुक्त कार्यालय मध्ये शांतता कमिटी मध्ये अनेक उपायोजना व वेळोवेळी सूचना करून शहरातील शिवजयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती रमजान बकरी ईद गणेशउत्सव दसरा सह अनेक साजऱ्या करणाऱ्या सणा बाबत आपले मत व विचार शांतता कमिटी च्या माध्यमातून पोलीस प्रशासन ला कळवले होते पत्रकारांच्या प्रश्नासह समाजातील दुःखी पीडित घटकाला न्याय देण्यासाठी थेट पोलीस आयुक्त यांना संवाद साधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याने यशवंत पवार यांच्या सामाजिक चळवळ, तळमळ व धडपड या
कामाची सोलापूर पोलीस आयुक्त यांनी दखल घेऊन यशवंत पवार यांची पोलीस आयुक्त कार्यालय शहर शांतता कमिटी मध्ये सलग दुसर्यांदा सदस्य पदी निवड केली असून याबाबत यशवंत पवार यांचे सर्वस्तरावर अभिनंदन होत आहे एका अभ्यासू पत्रकार ची निवड झाल्याने पत्रकारांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे