भीम सैनिकांच्या वतीने घाटकोपर मध्ये व्यंकय्या नायडूच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांची प्रतिमा जाळून निदर्शने

148

बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर : राज्यसभेतील खासदार शपथविधी प्रसंगी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय घोष केला असताना या घोषणेला घटनेच्या आधारावर सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेत घोषणेला कामकाजातून वगळले . राज्यसभेतील या शपथविधी प्रसंगावरून देशभरातील शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करत व्यंकय्या नायडू यांचा निषेध केला जात आहे. काल ( दि 24 ) रोजी घाटकोपर पश्चिम भीमनगर येथे भीम सैनिकांच्या वतीने व्यंकय्या नायडूच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांची प्रतिमा जाळून निदर्शने करण्यात आली. यावेळी एड अभिषेक सावंत यांच्या नेतृत्वाखाली भीम सैनिकांनी पोस्टरवर जय शिवराय लिहून शिवरायांचे समर्थन केले आणि भीम सैनिकांच्या वतीने व्यंकय्या नायडू यांनी जय शिवराय लिहिलेले पत्र त्यांच्या निवासस्थानी पाठवण्याची घोषणा केली. यावेळी जय भवानी , जय शिवाजी असा जय घोष करण्यात आला.