आदिवासी दिन साजरा करण्यासाठी मंजुरीची मागणी .. अहेरी तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्री यांना आदिवासी बांधवांनी दिले निवेदन……

145

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम- 9 आगष्ट विश्व आदिवासी दिन असल्याने आणि हा सर्वांसाठी महत्वाचा दिन असल्याने या दिनाचा सन्मान व विश्व आदिवासी दिन साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात यावे यासाठी आदिवासी समाज बांधवांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे आणि आदिवासी विकास मंत्री ना.के.सी.पाडवी यांना अहेरीच्या तहसीलदारा मार्फत शुक्रवारी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी समाजामध्ये बोली भाषा, संस्कृती, रूढी, परंपरा, प्रथा याचे जतन व आदिवासी समाजातील पारंपरिक संविधानिक अधिकार मिळण्याकरिता संयुक्त राष्ट्र संघाने 9 आगष्ट 1994 या दिवशी विश्व आदिवासी दिवस घोषित केले त्यामुळे हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येते.
यंदा कोरोनाचे(कोविड-19) प्रादुर्भाव असल्याने आणि ठाळेबंदी व संचारबंदी मुळे आदिवासी दिन साजरा करण्यासाठी मोठी चिंता वाढली असून फिजिकल डिस्टनसिंग व अन्य नियम बंधनकारक ठेऊन परवानगी देण्याचे करावे अशा स्वरूपाची परवानगीची मागणी आदिवासी बांधवांनी निवेदनातून केले आहे.
निवेदन देतांना येरमनार येथील सरपंच बालाजी गावडे, वासुदेव कोडापे, वारलू आत्राम, संतोष मडावी, मोरेश्वर कुमरे, राकेश तोरेम, सत्यनारायण कुमरे,दौलत नैताम, भिऊजी कोडापे, विनोद मडावी आदी उपस्थित होते.