मुंबई छात्रभारतीचे UGC सचिवांना स्मरणशक्ती वाढविण्यासाठी पुस्तक भेट.

110

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई, दि.२४ मुंबई छात्रभारतीच्या वतीने ‘MEMORY HOW TO DEVELOP, TRAIN ,AND USE IT’ हे पुस्तक युजीसीच्या सचिवांना भेट देऊन अनोख्या पध्दतीने निषेध व्यक्त केला आहे. अंतिम वर्षाच्या परिक्षांसंदर्भात युजीसीची सुरुवातीची भूमिका व आत्ताची भूमिका विरोधाभासी असल्याने युजीसी सचिवांना विस्मरणाची समस्या असल्याचे आमच्या निदर्शनास आले.म्हणून हे पुस्तक भेट देत असल्याचे मुंबई छात्रभारतीचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले.

अंतिम वर्षाच्या परिक्षांसंदर्भात युजीसीचा निर्णय निषेधार्य आहे.वारंवार बदलणारी भूमिका विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकणारी आहे. युजीसी सचिवांना सद्यपरिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी मुंबई छात्रभारतीच्या वतीने ‘MEMORY HOW TO DEVELOP, TRAIN ,AND USE IT’ हे विल्यम वाॕकर यांचे पुस्तक स्पीड पोस्ट द्वारे पाठवले असुन ते वाचुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेतील अशी आशा छात्रभारती मुंबईचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी व्यक्त केली..