प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रसिद्धी रथाला हिरवी झेंडी दाखवून केले रवाना

 

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
भामरागड तालुक्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालय तर्फे पीक विमा भरण्यासाठी मोठ्याप्रमाणात आव्हानासह जनजागृती करण्यात येत आहे.सोबतच ऑडिओ क्लिप द्वारे गावागावात जनजागृती करणाऱ्या चारचाकी रथाचाही समावेश असून या रथाला उप विभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मनुज जिंदल यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
पीक विमेकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2020 आहे. भामरागड तालुक्यात फक्त एकदाच भाताची शेती केली जाते, यावरच पूर्णकुटुंबाचा उदरनिर्वाहासह घरखर्च आणि इतर खर्चही भागविले जाते त्यामुळे तालुक्यातील शेतकरी जीवपणाला लावून शेती करतात. मात्र, निसर्ग जर कोपला तर या शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नाही त्यामुळे एक सतर्कता म्हणून शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या या योजनेच्या सर्वांनी लाभ घेण्यासाठी कृषी विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे त्याचास एक भाग म्हणून पीक विम्याची माहिती ऑडिओ क्लिप द्वारा माहिती देण्याकरता रथ भामरागड ला दाखल झाले असता मनुज जिंदल उपविभागीय अधिकारी एटापल्ली तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प भामरागड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रथ रवाना केले. यावेळी गोई कोडापे सभापती पंचायत समिती भामरागड,सत्यनारायण सिलमवार तहसीलदार भामरागड,पुपल्लवार नायब तहसीलदार भामरागड,अनमोल कांबळे नायब तहसीलदार भामरागड,शनवार प्रभारी तालुका कृषी अधिकारी भामरागड,मसराम पर्यवेक्षक तसेच कृषी विभागातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.