Home अकोला श्री. झामसिंग महाराज(मुंडगाव) यांची पुण्यतिथि

श्री. झामसिंग महाराज(मुंडगाव) यांची पुण्यतिथि

764

 

श्री.गजानन महाराजांचे निकटतम परम शिष्यापैकी श्री. गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव चे संस्थापक श्री झामसिंग राजपूत हयांची आज पुण्यतिथि श्री.झामसिंग डोंगरसिंग शेखावत (राजपूत) उर्फ दादाजी यांनी २५ जुलै १९१० ला आपला देह त्यागला.
दादाजी हे त्या काळातील सर्व सुख सोईंनी संपन्न असे गृहस्थ होते. ३१ एकर शेती व गावात मावद माडीचा वाडा होता. तापट स्वभावाच्या झामसिंगाचा गावात बराच दरारा होता.
अश्या या भक्ताचा श्री. गजानन विजय ग्रंथामधे अध्याय ११,१३,व १६ मध्ये उल्लेख आलेला आहे. श्रींच्या भक्तांमध्ये वयाने ज्येष्ठ असे होते. त्यांच्या माध्यमाने नंतर अनेक भक्त महाराजांशी जुळले. महाराजांची झामसिंगांवर विशेष कृपा होती, हे मुंडगावातील सर्व लोकांना माहीत होते.
श्री. झामसिंग यांना राणीका नावाची एक बहीन होती. तीचा मुलगा म्हनजे श्री. झामसिंगांचा भाचा अडगावचा निरुसिंग राजपूत हा झामसिंगाच्या माध्यमातुन महाराजांचा भक्त झाला.
श्री. झामसिंगाने महाराजांना अडगावला निरुसिंग कडे हनुमान जयंती उत्सवाला आमंत्रित केले. महाराज झामसिंग,श्री .भाष्कर पाटील व अन्य शिष्यासहीत या उत्सवाला आले. दी २६ /४/१९०७ ते २/५/१९०७ या दरम्यान झामसिंग गजानन महाराज सोबतच होते.
त्या आधी १९०६ ला श्री. गजानन महाराजांनी पुंडलिक भोकरेंच्या स्वप्नात दृष्टांत दिलेल्या प्रासादीक चरण पादुका प्रत्यक्ष श्री. झामसिंग जवळ श्री.पूंडलिक महाराज भोकरेसाठी पाठवल्या . पूंडलिकांजवळ पर्याप्त जागा नसल्याने, दिव्य पादुका सुरक्षित रहाव्या तसेच सर्व भक्तांना दर्शन करता यावे. याकरीता श्री. झामसिंगाने स्वतःचा वाडा व शेती दान करन्याचा संकल्प केला. व नंतर दि ४/२/१९१० ला रितसर दानपत्र केले . व श्री. गजानन महाराज यांनी श्री. झामसिंग यांना दिलेल्या चरण पादुका व पुंडलिक महाराज यांना दिलेल्या प्रासादिक पादुकांची पुंडलीकाच्या संमतीने स्थापना केली. श्री.झामसिंग महाराज हे श्री.गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव चे संस्थापक आहेत.
श्री. झामसिंगांनी गजानन महाराज यांना मुंडगावला येन्याचा आग्रह केला. महाराज झामसिंगाच्या भक्तीवर प्रसन्न होते. वैभव संपन्नतेचे वैराग्य सहसा दृष्टिस पडत नाही.,असे वैराग्य झामसिंगाच्या जोडीस होते. आणी जेथे असे सच्चे वैराग्य आहे भक्ति भाव व प्रेम आहे. तीथे महाराजांनी जान्याचे नाकारने शक्य नव्हते.
१६ जाने. १९०८ गुरुवारला श्री. गजानन महाराज श्री. झामसिंग सोबत मुंडगावला आले.महाराजांची भजनी दींड्या सहित रथात बसवुन मिरवनुक काढली. झामसिंगाने दूसरे दीवशी १७ जाने.ला महाप्रसादाचे आयोजन केले. परंतू महाराजांनी आज चतुर्दशी आहे. महाप्रसाद करू नका असे सांगीतले. पण याकडे लक्ष न देता, ग्रामस्थांनी महाप्रसादाचा स्वयंपाक सूरू केला. क्षणात मूसळधार पाऊस, वारा वादळ सूटले,. सर्व अन्न वाया गेले. सर्वांनी महाराजांची क्षमा मागीतली तेव्हा महाराजांनी आकाशाकडे पाहीले. सर्व वातावरण शांत झाले. महाराजांनी दूसरे दीवशी दी. १८ जानेवारी १९०८ (पौष पोर्णिमा ) ला महाप्रसाद करा असे सांगीतले. त्या दिवशी महाराजांच्या उपस्थितीत भंडारा झाला. तीच प्रथा आजही मुंडगावला सूरू आहे.
श्री.झामसिंगाने पादुका, विश्रांतिचा पलंग, धूनीची जागा, रथाचा अवशेष जतन करून ठेवला. नंतर पांच मंडळीच्या स्वाधीन ही अनमोल संपत्ति दिली.
श्री. झामसिंगानी फार मोठ्या भक्तीची ठेव मुंडगावला दिली. त्यांनी स्वताचे आयुष्य महाराजांच्या सेवेत खर्ची घातले. २५ जुलै १९१० ला आपला देह महाराजांच्या चरणी ठेवला.
>>>>>विजय ढोरे, मुंडगाव 9881953851

Previous articleसरकार पाडून दाखवा मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान !
Next articleप्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रसिद्धी रथाला हिरवी झेंडी दाखवून केले रवाना