जनता कर्फ्यू बाबत नागपूरकरांत संभ्रमाचे वातावरण! जनता कर्फ्यू नेमका कुठे नागपुर शहरात की संपुर्ण जिल्ह्यात?

0
611

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर: २४ जुलै २०२०
दिवसेंदिवस कोरोना चे संकट नागपुरात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे व महापौर संदीप जोशी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उद्या दि. २५ व २६ जुलै २०२० रोजी जनता कर्फ्यू लागु केला असल्याचे जाहीर केले.
त्यामुळे नागपुर शहरात कोणीही घराबाहेर पडु नये केवळ एमरजंसी, मेडिकल सेवा, व अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्णपणे कडक लाँक डाऊन राहणार असुन विना कारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई तसेच विविध प्रकारचे दुकाने, कपडा मार्केट भाजीपाला मार्केट, किराणा सर्व पुर्णपणे बंद राहतील. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांचे लायसन्स सुद्धा रद्द करणार असे आज मनपा आयुक्त तुकाराम मुंडे व महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. लोकांना वारंवार सांगुन ही ते लाँक डाऊन तोडुन विनाकारण गर्दी करीत आहेत तसेच एका भागातून दुसऱ्या भागात गर्दी सारखे कार्यक्रम आयोजित करुन कोरोना चा संसर्ग वाढवित आहेत. त्यामुळे लोकांच्या सवयी बदलविण्यासाठी उद्या पासून २ दिवस शनिवार व रविवारी कडक लाँक डाऊन राहणार आहे.
पण त्याचबरोबर नागपुर मनपा हद्दीच्या बाहेर नागपुर ग्रामीण भागात हा जनता कर्फ्यू राहील की नाही यांबाबत नागपूर करांत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण यासंदर्भात अजुनही नागपुर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी जनता कर्फ्यू संदर्भात अजुन कुठलाही असा अद्यादेश काढला नसुन त्यामुळे ग्रामीण भागात हा जनता कर्फ्यू राहील की नाही असे ग्रामीण भागातील नागरिक प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे नागपुर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे तसेच नागपुर पोलीस आयुक्त, व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी ग्रामीण भागातील नागरिकांचा संभ्रम दुर करावा.