अकोट शिवसेनेच्या वतीने व्यंकय्या नायडू यांचा जाहीर निषेध

118

 

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्निल सरकटे

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खास.उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी घोषणा दिली असता.हे सभागृह माझे आहे अशा घोषणा चालणार नाहीत असे बजावून व्यंकय्या नायडू ह्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला.त्यांच्या निषेधार्थ स्थानिक शिवसेना अकोट च्या वतीने व्यंकय्या नायडू यांच्या फोटो ला चप्पला मारून नायडू मुर्दाबाद च्या घोषणा देऊन अकोट येथील स्थानिक शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने निषेध केला.यावेळी प्रामुख्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,तालुका प्रमुख श्याम गावंडे,शहर प्रमुख सुनील रंधे,शिवसेना गटनेते मनिष कराळे,युवासेना उपजिल्हासंघटक राहुल कराळे यांच्यासह रोशन पर्वतकर,कुणाल कूलट,जितेश चंडालिया,सोपान साबळे,अक्षय घायल ,मनीषभाऊ कराळे,सुभाष सूरत्ने,बाबाराव तायडे,प्रफुल्ल गुप्ता,विश्राम गवते,शिवा गोटे,अनिल जवंजाळ,संतोष ईपर,गोपाल कावरे,विजय जवंजाळ,गजानन भंडाले,दिनेश बोचे,नयन तेलगोटे,आशिष जवंजाळ,विशाल कूलट,गजानन कौलखेडे,हिरा तेजवाणी,प्रफुल्ल बोरकुटे,देव नृपनारायण,पिंटू वानखडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.