अकोट न.पा. क्षेत्रात आरोग्य तपासणीस सुरुवात

0
129

 

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्निल सरकटे

अकोट नगर परिषद क्षेत्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टीने आशा सेविकांचे प्रशिक्षण उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे यांचे मार्गदर्शनात अकोट नगर परिषद सभागृहात आयोजित करण्यात आले होते.या प्रशिक्षणात नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनची आॅक्सीमीटरद्वारे तपासणी करणे शरीराचे तापमान तसेच covid-19 ची लक्षणे असलेल्या नागरिकांची यादी तयार करून अशा नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अकोट नगर परिषद व आरोग्य विभागाचे संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी करायची असून आशा सेविका व नगर परिषद शिक्षक यांची पथके तयार करण्यात आली आहेत व संबंधित प्रभागाचे नगरसेवकाचे मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत आशा सेविका व न.पा.चे शिक्षकांचे माध्यमाने शहरातील घरोघरी जाऊन ऑक्सि मीटर च्या साह्याने नागरिकांचे शहरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे, मुख्याधिकारी मनोहर आकोटकर, जिल्हा रुग्णालय अकोला चे डॉ. राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष तोरणेकर, तालुका आरोग्य सहाय्यक डॉ. प्रमोद येऊलकर, प्रशासन अधिकारी प्रदीप रावणकर, कार्यालय अधीक्षक गौरव लोंढे, नोडल अधिकारी रोशन कुमरे गटप्रवर्तक सौ. कळस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.