भाजपा युवा मोर्चाकडून खा.शरद पवारांना पाठवले दहा लाख जय श्रीराम लिहिलेले पत्र

बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर :भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऐतिहासिक आयोध्यातील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. यानिमित्ताने देशभरात राम भक्तांमध्ये उत्साह निर्माण झालेला असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंदिर आणि कोरोना संदर्भात केलेल्या विधानामुळे राम भक्तांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. शरद पवारांच्या विधाना नंतर सर्वत्र निदर्शने केली जात असून दहा लाख जय श्रीराम लिहिलेले पत्र भाजपा व युवा मोर्चाकडून पाठवण्यात येत आहे . काल दिनांक 24 जुलै रोजी साकीनाका पोस्ट ऑफिस येथे भाजपा व युवा मोर्चा तर्फे जय श्रीराम च्या घोषणा देत शेकडो पत्र शरद पवार यांना पाठवण्यात आले. भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव संतोष सिंग ठाकूर , राष्ट्रीय सदस्य शुभ्रंशु दीक्षित यांच्या आयोजनाखाली हे पत्र पाठवण्यात आले. भगवान श्रीराम हे हिंदू धर्मियांचे आस्थेचा विषय असून अयोध्ये मध्ये भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारणार आहे या संदर्भात कुणी राजकारण न करता सर्वांनी शामिल झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया युवा मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य शुभ्रंशु दीक्षित यांनी दिली. यावेळी युवा मोर्चाचे निलेश नार्वेकर , सुभेदार यादव , राकेश यादव , परवेश यादव उपस्थित होते.