कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत प्रभाग दोनची निवडणूक होणार बनवाबनवीच्या प्रचारामुळे रंगतदार…. — कोटगाव ग्रामपंचायत मध्ये उपक्षम रामटेके यांच्या सारखा दमदार व प्रभावशाली सदस्य हवा… — मतदार जिंकणार?

0
220

शुभंम पारखी
ग्रामीण तालुका प्रतिनिधी चिमूर
कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक दोनची निवडणूक,”बनवाबनवीच्या प्रचाराला अनुसरून,”रंगतदार होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मात्र या प्रभागात,उभे असलेले तरुण व जबाबदार उमेदवार उपक्षम रामटेके यांची बाजू मजबूत असून,त्यांना हरविण्यासाठी अभद्र अशा छुपेरुस्तंम युतीच्या लोकांकडून मोर्चेबांधणीला उधाण आले आहे.
उमेदवार उपक्षम रामटेके हे समजदार व मनमिळावू स्वभावाचे आहेत.ते सर्वांसोबत मिळून राहतात,एवढेच काय तर कुणाच्याही मदतीला ते धावून जातात.यामुळे उपक्षम रामटेके हे मतदारांत लोकप्रिय ठरले आहेत,मतदारांच्या जवळचे झाले आहेत.
कोटगाव ग्रामपंचायत निवडणुकीत उपक्षम रामटेके यांना पराभूत करणे कठीण आहे,यांची जाणीव भ्रष्ट्र लोकांना झाल्यामुळे,”त्यांनी,भितीपोटी अभद्र अशा छुप्या युती द्वारे उपक्षम रामटेके यांना एनकेन प्रकारे पराभूत करण्यासाठी, बनवाबनवीच्या प्रचारातंर्गत दंड थोपटले आहे.
उमेदवार उपक्षम रामटेके हे लाचखाऊ,दलाल,चमचा, नसल्यामुळे ते भ्रष्ट्राचारी लोकांना भारी ठरणार आहेत.यामुळे,”त्यांना,पराभूत करण्यासाठी दारुसह-मटनाची मेजवानी मतादारांना देण्यासाठी,भ्रष्ट व्यक्ती घरी बसून पडद्याआड काम करतो आहे.तरीही उपक्षम रामटेके सारख्या समजदार व उच्चशिक्षित नवतरुणाचा पराभव करणे शक्य नसल्याचे मतदारांत बोलल्या जात आहे.
कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक दोनची निवडणूक उपक्षम रामटेके यांना विजय करून गाव परिवर्तनाला नवा आयाम देणारी ठरणार असल्याचे मतदारातंर्गत भावनांचे बोलके चित्र आहे.
परंतू मतदार हे अयोग्य प्रचाराला बळी ठरणार काय?याचे वास्तव्य निवडणूक निकालानंतर समोर येईलच!”मात्र,होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत इमानदार मतदार जिंकायलच हवा,अशी अपेक्षा करणे चुकीचे नाही.