खळबळजनक बातमी, विषारी द्रव्य प्राषण करुन शेतकर्याची आत्महत्या,साखरा (दरा) पोडावरील घटना

334

 

वणी : परशुराम पोटे

तालुक्यातील साखरा(दरा)येथिल पोडावर एका शेतकर्याने विषारी द्रव्य प्राषन करुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
नामदेव अय्या कोडापे (४६)असे विषारी औषध प्राषन करुन म्रुत्यु झालेल्या शेतकर्याचे नाव असुन तो साखरा(दरा)पोड येथिल रहिवाशी अाहे. दि.२३ जुलै गुरुवारला रात्री ८ वाजताचे दरम्यान नामदेव ने आपल्या राहते घरी विषारी द्रव्य प्राषन केले.या घटनेची माहिती कुटुंबातील सदस्यांना मिळताच उपचारासाठी तातडतोब वणी येथे ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची प्रक्रुती अत्यंत गंभिर असल्यामुळे पुढिल उपचाराकरिता चंद्रपुर येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असतांना आज दि.२४ जुलै ला पहाटे २ वाजताचे दरम्यान नामदेव चा म्रुत्यु झाला. त्याचे पाठीमागे व्रुद्ध आई,पत्नी व भाऊ आहे. नामदेव यांनी विषारी द्रव्य प्राषन का केले?याची माहिती कळु शकली नाही.पुढिल तपास पोलीस करित आहे.