सिरिनभाई नेत्रवाला मानेकनगर माडगी विद्यालय प्रसाशन करतो पालकांची दिशाभूल विद्यार्थी प्रवेशासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून चालतो सिरीनभाई नेत्रवाला शाळेचा प्रभार सिरीनभाई नेत्रवाला शाळा प्रशासनाविरुद्ध गटशिक्षणाधिकारी तुमसर यांचा कार्यवाही अहवाल शिक्षणाधिकारी यांचेकडे सादर

252

 

अतित डोंगरे/बिंबिसार शहारे

तिरोडा : सिरीनभाई नेत्रवाला शाळेत पालकांची दिशा भूल करून पैसे उकळले जात आहे. कोणतेही नियमानुसार कार्य केले जात नाही. शाळेत तक्रार पेटी नाही. शाळा पालक – शिक्षक व्यवस्थापन समिती आहे. पण त्याचे फलक कुठेच नसल्याचे धक्कादायक बाब एका पालकाने समोर आणले आहे. यावरून शाळेच्या गलस्थान कारभारास संबंधित अधिकारी वर्गाचे तर पाठबळ नाही ना ! अशी शंका व्यक्त केली आहे.

वृत्त असे की, तक्रारकर्ता पालक आपल्या मुलीचा पहिल्या वर्गात दाखला घेण्यासाठी गेला. त्या मुलीची जन्म तारीख ही १६ ऑक्टोबर अशी होती. आपल्या मुलीचे पहिल्या वर्गात एड्मिसन होवून जाईल असे सांगून मुलीचे शाळा प्रवेश करण्यात आले.

मुलीस (समीक्षा) ला वर्षभर शाळेत घेण्यात आले. तिची परीक्षा देखील घोषित झाली. ती पास देखील झाली. आता तिचे पहिल्या वर्गातिल दाखला रद्द झाला. असे प्राचार्य यांनी सांगितले. त्यावर पालकाने पहिल्या वर्गाची फी अदा करणार नाही. अशी विनंती केली. यावर प्राचार्य यांनी मला आपल्या मुलीचे दाखला केजी २ मध्ये दाखविन्यात येईल. आणि पहिल्या वर्गाची घेतलेली फी केजी २ च्यां फी मधून कमी करून उर्वरित फी आपणास अदा केली जाईल. या पेक्षा जास्त शाळा करू शकत नाही. जास्तीत जास्त आपल्यास एड्मिसन रद्द करून एड्मिसन फी दिली जाईल. असे झाल्यास शाळा पुन्हा त्या मुलीस प्रवेश देणार नाही. असेही सुतोवाच केले. आपन जास्त काही केल्यास आपला दूसरा पाल्य याचा देखील एड्मिसन रद्द केले जाईल अशी तंबी दिली.

सदर सिरीनभाई नेत्रवाला शाळेचा निर्णय न पटल्याने शाळेची तक्रार देण्यास गेले असता आपण असे काही करू नका. आपणास एड्मिसन फी आणि ट्यूसन फी अदा केली जाईल असे सांगून आपण आज सोडून पुनः कधी या. अशी फूस देण्यात आले. पालक दिनाक २६ जून २०२० ला प्रत्यक्ष गेले असता केवळ प्रवेश फी १५०००/- चॅ चेक अदा करण्यात आले. मात्र ट्यूसन व इतर फी अदा करण्यात आले नाही.

पालकांस प्रवेश फी देतांनी आपण तक्रार केल्यास आपल्या दुसऱ्या मुलाचे एड्मिसन रद्द केले जाईल असे सांगितले. या पालकाचा दुसरा मुलगा सिरीनभाई नेत्रवाला शाळेचा वर्ग ५ वी चा विद्यार्थी आहे.

एका क्षुल्लक कारणे तक्रारकर्ताचे पाल्यास चक्क शाळेच्या ऑनलाइन अभ्यास क्रमातून देखील लेफ्ट केले असल्याचा प्रकार पालकाने सांगितले आहे.
यास न जुमानता पालक विशेष दिनांक २९ जून २०२० रोजी घडल्या प्रकारची तक्रार शाळा पालक व्यवस्थापन समिती अध्यक्ष/सचिव यांना देण्यासाठी गेला होता. तर शाळेच्या कर्मचा-यांनी तक्रार घेण्यास मनाई केली. यावर पालकाने *तक्रार पेटी कुठे आहे ?असे विचारणा केल्यावर विद्यालयात तक्रार पेटिच नसल्याचे समोर आले. जेंव्हा की तक्रार पेटी शाळेचे दर्शनीय ठिकाणी लावणे हे शाळा व्यववस्थापनाचे बंधनकारक कार्य आहे. पालक शिक्षक समितीचे फलक कोठेच आढळून आले नाही. उल्लेखनीय असे की, शाळा पालक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे सिरिनभाई नेत्रवाला विद्यालयाचे प्राचार्य जबाबदार व्यक्ती असून त्यांचा बेजबाबदारपणा पालकांकडून उघड केला जात आहे.

नियमबह्य कार्य करून पालकांची फसवणूक होत आहे. याची तक्रार पालकाने शाळा प्राचार्य, गट शिक्षिणाधिकारी, प्राथमिक शिक्षिणाधिकारी, जिल्हाधिकारी यांना केली आहे. या नियमबाह्य कार्य करणाऱ्या, नियम धाब्यावर बसवून कार्य करणाऱ्या सिरीनभाई नेत्रवाला शाळेची मान्यता काढून घेण्यात यावी. अशी यावेळी पालकाने मागणी केली आहे.

खाजगी शाळा असल्याने मनमर्जी कारभार संस्थापक/ट्रष्ट करीत असतात. याचा उत्तम नमुना पालक यांनी दाखवून दिला आहे. यावर अंकुश बसावा. आणि शिक्षण क्षेत्राला केवळ व्यापार बनविन्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अशी गळ गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, शिक्षण मंत्री यांना केली आहे. आता अनागोंदी शाळेचा कारभार करणाऱ्यां सिरीनभाई नेत्रवाला शाळेवर कोणती कार्यवाही केली जाते याकडे पालकांचे लक्ष लागले होते.

व्यथित पालकाने तक्रार वरिष्ठांना केले असल्याचे कळताच शाळा प्राचार्य यांनी कुरघोडीने ५ व्या वर्गात शिकणाऱ्या मुलास काढून घेण्याचे पत्र निर्गमित केले आहे. सिरीनभाई नेत्रवाला शाळा व्यस्थापन यांचे त्रयस्थ वागणुकीने व्यथित होऊन आपनास न्याय मिळण्याचे हेतूने पत्रकार परिषदे औचित्य आहे. या उपरांत न्याय न मिळाल्यास मिळाल्यास आपण उपोषण करण्याचे मनसुबा व्यक्त केला आहे.