बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

कूरखेडा/राकेश चव्हान प्र
तालूक्यातील घाटी येथील नवीनवसाहत येथे फिरत असलेल्या गायी वर बिबट ने हल्ला करत ठार केल्याची घटणा गूरूवार रोजी रात्री १० ते १२ वाजेचा सूमारास घडली गाय ही कूमार गोविंदा शेन्डे यांचा मालकीची होती यापूर्वी सूद्धा बिबट्याने गावातील पाच जनावरांचा फडशा पाडल्याची माहीती गावकर्यानी दिली यामूळे गावात दहशत निर्माण झाली आहे वनविभागाने त्वरीत बिबट्याचा बंदोबस्त करावा व गायी च्या मालकाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकर्यानी केली आहे
कूरखेडा – कढोली मार्गावर असलेला घाटी या गावाचा सभोवताल शेती व जगंल असून येथे नेहमीच रानटी प्राण्याचे विचरण असते।