Home क्राइम लैंगिक अत्याचाराच्या घटनेने सावली तालुका हादरले सावली तालुक्यातील महिला असुरक्षित  सलग एकामागोमाग...

लैंगिक अत्याचाराच्या घटनेने सावली तालुका हादरले सावली तालुक्यातील महिला असुरक्षित  सलग एकामागोमाग एक तालुक्यात तिसरी तर पाथरी परिसरात दुसरी घटना.

411

 

मंगेश सहारे
सावली प्रतिनिधी -दखल न्युज भारत
मो.नं : – 9921057753

सावली – एकीकडे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार “बेटी बचाओ बेटी पढाओ” अभियान संयुक्तपणे राबवत असून भारतीय संविधानात महिलांच्या सुरक्षेबाबत कडक कायदे करण्यात आले असून सुद्धा या सुसंस्कृत समाजात कायद्याची जराही भीती न बाळगता सऱ्हास वाढते अत्याचार तसेच बलात्कारामुळे महिला सुरक्षित नसल्याने दिवसेंदिवस महिलांबाबत सुरक्षेचा प्रश्न फार गंभीर आणि चिंतेचा विषय बनला आहे .
अशीच सुसंस्कृत महाराष्ट्राला काळिमा फासणारी तसेच कायद्याला लाजवणारी घटना काल (दि. 23) रोजी दुपारच्या सुमारास पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा निमगाव येथे 50 वर्षीय नराधमाने 16 वर्षीय मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहे.
सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून हंगामी शेतीचे कामे सुरु असल्याने पीडित मतिमंद मुलीचे आईवडील शेतात काम करायला गेले असल्याने पीडित मतिमंद असल्यामुळे तिच्यावर लक्ष देण्याकरिता स्वतःच्या मुलाला घरी राहण्यास सांगितले. पीडित मुलगी ही घराबाहेर असताना अचानक एकाएकी पावसाच्या सरींनी सुरुवात केल्याने चौकात असलेले नागरिक आपआपल्या घरी गेले असता त्याच गावातील वासुदेव मोहुर्ले (वय 50 वर्ष) या नराधमाने संधीचा फायदा घेत पीडितेच्या हाथ पकडून स्वतःच्या घरी नेले. काही वेळानंतर पाऊस थांबल्याने पीडितेच्या भावाला आपली मोठी बहीण घरी नसल्याचे समजताच त्याने इकडेतिकडे शोधाशोध सुरु केला असता वासुदेव मोहुर्ले या नराधमाने स्वतःच्या घरी नेल्याची माहिती मिळाली. तिथे जाऊन आरोपीच्या घराचे दार ठोठावले असता दोघेही एकाच खाटेवर बसून दिसल्याने 12 वर्षीय भावाला धक्काच बसला. घटनेचे गांभीर्य समजले असता आपल्या मतिमंद बहिणीचा फायदा घेत या नराधमाने अत्याचार केलेला आहे. ही माहिती आपल्या आईवडिलांना दिली असता पीडित मुलीचे फिर्यादी आईवडील यांनी पाथरी पोलीस स्टेशनं गाठून घटनेची माहिती देत तक्रार दाखल केली. तक्रारीला लगेच प्रतिसाद देत पाथरी पोलीस स्टेशनचे अधिकारी घारे यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक करत 376 (2) भा.द.वि.सह कलम 4, 6 पास्को कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला असून स.पो.नि. घारे यांनी दोन वेगवेगळी तपास पथक तयार केली.पुढील तपास उपविभागीय अधिकारी अनुज तरी साहेब यांच्या मार्गदर्शनात स.पो. नि.पारधी मॅडम तथा घारे करीत आहेत.
आठवडा होत नाही तो पाथरी, सोनापुर, तसेच निमगावच्या तिसऱ्या घटनेने सावली तालुका संपूर्ण हादरले असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळेला उशिरा सुरुवात झाल्याने त्यानिमित्त तसेच इतर कारणास्तव घराबाहेर पडणारी, समाजात वावरणारी महिला ही अशा वातावरणात पोलीस प्रशासन तसेच कठोर कायदे असतांना सुद्धा घडणाऱ्या घटनांमुळे कितपत सुरक्षित आहे असे तालुक्यात तसेच पाथरी परिसरात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे .

Previous articleअकोट उपविभागात मास्क व सॅनिटाइजर चे वितरण क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड ( ग्रामीण कोटा) व नव्या दिशा संस्थेचा उपक्रम
Next articleबिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार