Home अकोला अकोट उपविभागात मास्क व सॅनिटाइजर चे वितरण क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड...

अकोट उपविभागात मास्क व सॅनिटाइजर चे वितरण क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड ( ग्रामीण कोटा) व नव्या दिशा संस्थेचा उपक्रम

186

 

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्निल सरकटे

19 कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक भावनेच्या दृष्टीकोनातुन या जागतिक महामारीच्या प्रतिबंधासाठी रात्रंदिवस लढणाऱ्या अकोट उपविभागातील कोवीड योधांना क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड ( ग्रामीण कोटा) तसेच नव्या दिशा शाखा अकोट या संस्थेच्या वतीने सॅनिटाइजर व मास्क वितरण करण्यात आले. संस्थेच्यावतीने हा कार्यक्रम संपूर्ण भारत भर राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अकोट उपविभागातील अकोट शहर, अकोट ग्रामीण, तेल्हारा पोलीस स्टेशन व हिवरखेड पोलीस स्टेशन, अकोटतहसील कार्यालय, अकोला जहाँगीर, अकोलखेड व हिवरखेड ग्रामपंचायत आणि अकोट शहरातील पत्रकार बांधव यांना मास्क व सॅनिटाइजर वितरण करण्यात आले.
वितरण करते वेळी संस्थेचे शाखा अधिकारी विकास अतकरे, उपशाखा अधिकारी उमेश भगत, एरिया अधिकारी श्री पंकज बागडे, तसेच कर्मचारी वर्ग भागवत वाघ, ज्ञानेश्वर बोडके, परमेश्वर मोरे, प्रदीप इंगळे, अनिस तडवी, दानिश खान, अविनाश इंगळे, सिद्धार्थ इंगळे, पवन सोळंके,पवन मंदार, विनोद गायकवाड यांचा सुद्धा सहभाग लाभला.

Previous articleबालरोगतज्ञ डॉ. मोरे जिल्हा रुग्णालयातील सेवा थांबविणार
Next articleलैंगिक अत्याचाराच्या घटनेने सावली तालुका हादरले सावली तालुक्यातील महिला असुरक्षित  सलग एकामागोमाग एक तालुक्यात तिसरी तर पाथरी परिसरात दुसरी घटना.