Home रत्नागिरी बालरोगतज्ञ डॉ. मोरे जिल्हा रुग्णालयातील सेवा थांबविणार

बालरोगतज्ञ डॉ. मोरे जिल्हा रुग्णालयातील सेवा थांबविणार

286

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : बालरोगतज्ञ डॉ. दिलीप मोरे यांनी जिल्हा रुग्णालयातील आपली सेवा थांबविण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला पत्र दिले. सेवानिवृत्त झाल्यानंतर गेली सात वर्षे जनसेवा करण्यासाठी ते पुन्हा जिल्हा रुग्णालयात रुजू झाले. कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून लहान मोठ्या सहित काही लहानग्या मुलांना देखील कोरोना झाल्याचे दिसून आले. कोरोनाच्या या काळात कोव्हिड योद्धा म्हणून 42 चिमुकल्यांवर त्यांनी यशस्वी उपचार करून त्या चिमुकल्यांची कोरोनाच्या विळख्यातून सुटका केली. जनसेवक म्हणून त्यांनी केलेले काम आदर्शवत ठरले आहे. कोरोना कालावधीमध्ये लहान मुले आणि 60 वर्षावरील व्यक्तीला घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने डॉ. दिलीप मोरे यांनी आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करून हायरिस्क घेण्यापेक्षा काम थांबविण्याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाला पत्र दिले आहे. त्यांना आता 65 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात कोव्हिड रुग्णालयामध्ये सेवा देणे त्यांच्यासाठी धोक्याचे आहे. म्हणून त्यांनी आपले काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. मोरे यांनी जिल्हा रुग्णालयात अनेक वर्षे सेवा दिली. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या उत्तम सेवेबद्धल पुन्हा आयपीजीएस खाली त्यांना सेवेत घेण्याबाबत निर्णय झाला. गेली सात वर्षे त्यानी जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या प्रदीर्घ काळाच्या अनुभवाचाही अनेकवेळा रुग्णालय आणि रुग्णांना चांगला फायदा झाला. त्यांनी सेवा थांबविण्याचे पत्र दिल्याने जिल्हा रुग्णालयाला नक्कीच त्यांची कमतरता भासणार आहे. डॉ. मोरे यांनी सेवा थांबवल्यावर तातडीने जिल्हा रुग्णालयात बाल रोग तज्ञ नियुक्त करावेत अशी मागणी आता रुग्णांकडून होत आहे.

दखल न्यूज भारत

Previous articleलोकांच्या सवयी बदलविण्यासाठी नागपुरात 2 दिवस कडक जनता कर्फ्यू- मा. तुकाराम मुंडे (मनपा आयुक्त)
Next articleअकोट उपविभागात मास्क व सॅनिटाइजर चे वितरण क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड ( ग्रामीण कोटा) व नव्या दिशा संस्थेचा उपक्रम