लोकांच्या सवयी बदलविण्यासाठी नागपुरात 2 दिवस कडक जनता कर्फ्यू- मा. तुकाराम मुंडे (मनपा आयुक्त)

1370

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर : २४ जुलै २०२०
नागपुरात कोरोना पाँजिटीव पेशंट ची संख्या दुपटीने वाढत आहे आणि नागरिक कोरोना पार्श्वभूमीवर शासकीय आदेशाची अवहेलना करतांना दिसत आहे वारंवार आवाहन करुनही नागरिक विनाकारण फिरत आहेत आणि कोरोना संक्रमण वाढवित आहेत त्यामुळे नाईलाजाने उद्या शनिवार आणि रविवार ला सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलत जनता कर्फ्यु पाळावा असे आवाहन मा. तुकाराम मुंडे (नागपुर मनपा आयुक्त) यांनी आज पत्रकारांसमोर बोलतांना सांगितले.
आज मीडिया शी बोलताना मुंडे म्हणाले की, वारंवार सांगुन ही नागरिक आपल्या वागण्यात सुधारणा करीत नाहीत त्यामुळे त्यांच्या सवयी बदलण्यासाठी उद्या शनिवारी व रविवारी कडक जनता कर्फ्यू राहील. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवा, मेडिकल एमरजंसी, दवाखाने तसेच डेली निड्स दुध वगैरे सेवा वगळता संपूर्ण प्रकारचे व्यावसायिक मार्केट, भाजीमंडी हे सुद्धा पुर्णतः बंद राहील असेही तुकाराम मुंडे यांनी सांगितले. या जनता कर्फ्यू ची मागणी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच प्रशासनिक अधिकारी यांचेकडुन आलेली असुन जनता कर्फ्यू तोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असेही मुंडे म्हणाले.