Home Breaking News ” संस्कृत सर्वच ज्ञानशाखांची गंगोत्री “- डॉ. स्वानंद पुंड  21 जुलै...

” संस्कृत सर्वच ज्ञानशाखांची गंगोत्री “- डॉ. स्वानंद पुंड  21 जुलै ऑनलाईन संस्कृत संभाषन शिबिर चे समारोप,,,

204

 

वणी : परशुराम पोटे

“संस्कृत भाषा म्हणजे केवळ प्रेमावरील नाटके किंवा धार्मिक-आध्यात्मिक विषयाचे लेखन नसून, जगात आज विद्यमान सर्वच ज्ञानशाखांची गंगोत्री ही संस्कृत भाषाच आहे. आपण ज्या विषयाचा अभ्यास करीत असाल त्या विषयात प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये दिलेल्या अनमोल ज्ञानाचा अधिष्ठान म्हणून वापर केला तर आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि त्या विषयाच्या अभ्यासाला अधिकाधिक विकसित करता येते. संस्कृत भाषेचा अभ्यास या दृष्टीने व्हायला हवा.
संस्कृत संभाषण शिबिर यासाठी मानसिकता निर्माण करण्याचे महत्त्वाचे साधन आहे” असे विचार विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी व्यक्त केले.
वणी येथील आदर्श प्रशासकीय महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाने संस्कृत भारती वणी शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या झूम मीटिंग वरील ऑनलाईन संस्कृत संभाषण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक रवींद्र गौरकार होते
प्राचार्य निशांत खोब्रागडे यांनी संस्कृत भाषेचे प्राचीन काळात भारतात असणारे महत्त्व स्पष्ट करून पुन्हा त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा यावर मार्गदर्शन केले.
यानंतर संभाषण वर्गात सहभागी झालेल्या,
आदर्श प्रशासकीय महाविद्यालयाच्या अश्विना वाघमारे या विद्यार्थिनीने शिबिर गीत सादर केले, वैष्णव थेरे याने संस्कृत वाक्य पठण, सचिन कोसारकर याने मम परिचय, तर भाग्यश्री बोधने या विद्यार्थिनीने अनुभव कथन केले.
या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सादरीकरण केले.
वर्गाचे प्रशिक्षक, संस्कृत भारती चे नागपूर नगर मंत्री लोकेश मेहता यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयासाबद्दल समाधान व्यक्त केले.
अध्यक्ष रवींद्र गौरकार यांनी अशा उपक्रमातून संस्कृत ही जनसामान्यांची भाषा आहे ही वास्तविकता अधिक सुस्पष्ट होते हे सांगत अशा उपक्रमांचे वारंवार आयोजन व्हावे ही मनीषा व्यक्त केली.
या संपूर्ण शिबिराचे तांत्रिक संयोजन प्रा.आनंद बन्सोड यांनी केले.
समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी जोशी हिने तर आभार प्रदर्शन प्रा. महेश पुंड यांनी केले.

Previous articleमौदा शहरात पुन्हा आढळले २ कोरोना पाँजिटीव पेशंट
Next articleअंतिम परिक्षा रद्द की जाये :- हरिश कोत्तावार जिल्हा युवक काँग्रेस कमिटी तर्फे राष्ट्रपति ला पाठविले निवेदन