चंद्रपूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक आम आदमी पार्टी पूर्ण ताकतीने लढेल आणि जिंकून येईल असा विश्वास आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रंगाजी राचूरे यांनी व्यक्त केले.

0
74

 

ऋषी सहारे
संपादक

आज चंद्रपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
आम आदमी पार्टीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रीयन जनता काँग्रेस भाजप या प्रस्थापित पक्षांच्या कारभाराला कंटाळली आहे. दिल्लीतील आम आदमी पार्टीने केलेल्या कामावर विश्वास ठेवून राज्यात पक्षाला बळ देत आहे. या बाळाच्या आधारावरच पुढील एक वर्षात चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व जागा लढवून महापालिका ताब्यात घेईल असा विश्वास श्री रंगा राचुरेजी यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश आम आदमी पार्टीचे कोषाध्यक्ष जगजित सिंहजी, विदर्भ अध्यक्ष प्रा. देवेंद्र वानखेडे, विदर्भ सचिव अविनाश श्रीराव, आम आदमी पार्टीच्या राज्य नेत्या अॅड. पारोमिता गोस्वामी, जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, महानगर संघटनमंञी प्रशांत येरणे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी
यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते ऊपस्थित होते.
आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले, माहिती अधिकार कार्यकर्ते हुमायु अली , शेतकरी सुकाणू समितीचे प्रदीप बोबडे राजूरा बल्हारपूरच्या अलका वेल्हे, कविता दोमाला, रूंदा मडावी, कविता मामीडवार, जानकी शुक्ला, जितेंद्र भाटीया, घोडपेठच्या विमल राजकुमार कवाडे यांनी पक्षप्रवेश केले.
मेळाव्याचे संचालन जिल्हा सचिव संतोष दोरखंडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी केले . राजेश चेडगुलवर
आम आदमी पार्टी, चांद्रपूर जिल्हा, महानगर सोशल मीडिया प्रमुख यांनी प्रेस नोट द्वारे कळविले आहे.