मौदा शहरात पुन्हा आढळले २ कोरोना पाँजिटीव पेशंट

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

मौदा /नागपुर :२४ जुलै २०२०
नागपुर जिल्ह्यातील मौदा शहरात मागील गुरुवारी म्हणजे १६ जुलै रोजी कोरोना पाँजिटीव निघालेल्या अंगणवाडी सेविका यांचा मुलगा व त्यांची सुन यांचा स्वैब नमुना पाँजिटीव आल्याने आता पुन्हा मौदा वासियांनी सावधानी बाळगण्याची गरज आहे.
मागील गुरुवारी पाँजिटीव निघालेल्या अंगणवाडी सेविका यांचा मुलगा(२८वर्ष ) व त्यांची सुन (३० वर्ष ) यांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मौदा येथे वैद्यकीय अधिकारी तसेच तहसीलदार यांनी होम कोरोंटाईन केले होते. आतापर्यंत मिळालेल्या पेशंट ची संख्या ही ५ झालेली आहे.
मौदा तहसीलदार प्रशांत सांगडे जी यांनी दखल न्यूज भारत शी बोलतांना सांगितले की मेयो रुग्णालयात वैकंसी बघुन या दोघांना शक्य तितक्या लवकर उपचारार्थ दाखल करण्यात येईल. आम्ही मेयो रुग्णालयाच्या उत्तराची प्रतिक्षा करीत आहोत तरीही नागरिकांनी भीती ना बाळगता घराबाहेर विनाकारण फिरू नये. सतत मास्क, सेनिटायजर चा वापर करावा तसेच नागरिकांनी फिजिकल डिस्टेंसिंग चे पालन केले तरच आपण सर्व मिळून कोरोना वर नक्कीच मात करु असेही मौदा तहसीलदार सांगडे जी यांनी सांगितले.