चिमूर तालुक्यात ४ रुग्ण कोरोणा बाधीत… — रुग्ण चेन्नई व मुंबई वरुन आलेले..

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर तालुकातंर्गत ४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.मात्र हे सर्व रुग्ण बाहेर गावावरून आलेले आहेत.या ४ रुग्णांपैकी १ बाधीत रुग्ण चिमूरचा आहे तर उर्वरित ३ बाधीत रुग्ण मौजा महादवाडी येथील आहेत.
बाहेर गावावरून आलेल्या या सर्वांना क्वाॅरंटाईन करण्यात आले होते व यांचे स्वॅब तपासणी साठी घेण्यात आले होते,आज चाचणी अहवाल आला असता,सदर चार रुग्ण कोरोणा बाधीत असल्याचे निष्पन्न झाले.महादवाडीचे ३ रुग्ण चेन्नई वरुन आलेले होते तर चिमूर येथील बाधीत मुंबई वरुन आलेले होते.