माजी शिवसेना तालुकाप्रमुख,सारंग धाबेकर यांना विनयभंग केल्याप्रकरणी चिमूर पोलिसांनी केली अटक…

0
527

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर तालुकातंर्गत अतिशय संवेदनशील व्यक्तीमत्व म्हणून सारंग धाबेकर यांची जनमानसात अगदी जवळून ओळख आहे.गोरगरीब नागरिकांच्या मदतीला धावून जाणे,हा त्यांचा नेहमीचा गुणधर्म.परंतू काल एका विनयभंग प्रकरणातंर्गत सारंग धाबेकर यांना चिमूर पोलिसांनी अटक केली.
सारंग धाबेकर यांचा,”सभाव,अनुभवाला अनुसरून रोखठोक आहे.न भिता व न घाबरता कार्य करण्याची त्यांची कार्यपद्धत अनोखी असीच आहे.
मात्र,एका जुन्या व नवीन प्रकरणातंर्गत,”त्यांच्या विरोधात,काल एका स्त्रिने त्यांच्या विरोधात चिमूर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.तक्रारीला अनुसरून भांदवी कलम ३५४,(विनयभंग करणे),व इतर कलमासह त्यांच्यावर चिमूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच त्यांना चिमूर पोलिसांनी अटक केली आहे.सारंग धाबेकर हे माजी शिवसेना चिमूर तालुका प्रमुख आहेत.