मौदा तालुक्यात युरिया चा क्रृत्रिम तुटवडा निर्माण करुन शेतकऱ्यांची लुट- विलास भोयर

0
202

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

मौदा / नागपुर :२४ जुलै २०२०
नागपुर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात सध्या खरिपाचा हंगाम सुरू असुन दानाची रोवणी व सोयाबीन ची शेती बहरली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यास युरिया ची अत्यंत आवश्यकता असते पण अशावेळी येथील खतविक्री करणारे दुकानदार हे जाणुनबुजुन युरिया चा क्रृत्रिम तुटवडा निर्माण करुन शेतकऱ्यांची अक्षरशः लुट करीत असल्याचा आरोप मौदा तालुक्यातील युवा शेतकरी डॉ. विलास भोयर यांनी केला आहे.
येथील क्रृषी सेवा केंद्र सांगते की युरिया संपला. युरियाचा तुटवडा खरोखरच आहे की हा क्रृत्रिम तुटवडा निर्माण करुन शेतकऱ्यांना बेभाव भावात युरिया विक्री करुन शेतकऱ्यांना येथील क्रृषी सेवा केंद्र लुटत आहेत. याकडे शासनाने तसेच नागपुर जिल्ह्यातील जनप्रतिनिधी यांनी वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे असे विलास भोयर यांनी मागणी केली आहे. जर वेळीच येथील क्रृषी सेवा केंद्रावर सुरु असलेल्या युरिया च्या काळाबाजारावर कारवाईची गरज आहे तसेच वेळीच शेतकऱ्यांना युरिया सहजरीत्या उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न कमी होऊन शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान होईल अशी भीती युवा शेतकरी विलास भोयर यांनी दखल न्यूज भारत ला बोलताना सांगितले