निमलगुडम जि.प.शाळेत शालेय पोषण आहार वाटप

0
84

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी :- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमलगुडम येथे आज दि.८ जाने.रोजी माहे डिसेंबर २०२०-जानेवारी २०२१ या दोन महिन्याचे शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शाळे बंद असून मध्यान भोजन योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना दुपारी देण्यात येणारे आहार म्हणून विद्यार्थ्यांना कोरडा आहार तांदूळ, दाळ, हरभरा शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री.के.एम.कोंडागुर्ले, सहाय्यक शिक्षक कु.एन.एम.पातावार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष नागेश शिरलावार,उपाध्यक्ष सुरेश बामनकर सदस्य सखाराम तलांडी,पूजा पेंदाम, राकेश सोयाम,सरिता आत्राम, विद्यार्थी प्रतिनिधी प्रीतम सोयाम, अंजली पेंदाम तसेच माता पालक उपस्थित होते.