शिवसेना युवासेना मारेगाव तालुका तर्फे जाहीर निषेध

148

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

मारेगाव:
राज्य सभेवर निवडून गेलेले मा. उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना जय भवानी जय शिवाजी अश्या प्रकारे घोषणा दिली होती. त्यामुळे उपराष्ट्रपती या सारख्या पदावर कार्य करत असणारे मा. वेंकय्या नायडू यांनी मा. उदयनराजे यांना समज देत जय भवानी जय शिवाजी अश्याप्रकरच्या घोषणा या सदनात चालणार नाही. ये तुम्हारा घर नही हमारा चेम्बर है अश्या प्रकारचे व्यक्तव केले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान व महाराष्ट्रातील जण भावनांशी खेळ या भाजपायी असलेल्या उपराष्ट्रपती यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना युवासेना मारेगाव तालुका यांचा तर्फे मारेगाव तहसील कार्यलयासमोर जाहीर निषेध करण्यात आला.जय भवानी जय शिवाजीहिं दुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ,जिंदाबादअश्या प्रकारच्या विविध घोषणा देण्यात आल्या.