राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहून पोस्ट कार्ड्स पाठविले.

 

प्रतिनिधी: रोहन आदेवार

वणी:
काल राज्यसभेत राज्यसभा अध्यक्ष श्री. व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस यवतमाळ शहर तर्फे राज्यसभा अध्यक्ष श्री. व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी,जय शिवाजी’ या घोषणा लिहून पोस्ट कार्ड्स पाठवण्यात आले आहेत.

‘ज्या राजाने रयतेचं राज्य स्थापन केलं, ज्यांच्या आदर्श, शिकवण आणि संस्कारावर हा देश चालतो आहे आणि विशेष म्हणजे ज्यांचे नाव घेऊन भाजपा सत्तेत आले त्या महाराजांच्या जयघोषाने सदनाचे कोणते पावित्र्य कमी झाले हे व्यंकय्या नायडु यांनी स्पष्ट करावे. कदाचित व्यंकय्या नायडूंना महाराजांच्या कार्याचा विसर पडला असेल तर गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे वाचन करावे. कालच्या घटनेबद्दल नायडूंनी जनतेची माफी मागावी.’ अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस यवतमाळ शहरचे शेखर सरकटे यांनी विधान परिषदेचे माजी आमदार संदीपभाऊ बाजोरिया व राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आशिष मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षा मनिषाताई काटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस यवतमाळ शहरचे वेदांत बोरखडे,वैभव पुरी, कौतुक लोखंडे, युवा परिवर्तन मंचाचे सदस्य निकेत मानकर, रोशन दोडेवार, पियुष धलवार, सुरज बनसोड, चेतन साखरकर आधी उपस्थित होते.