नागमंदिर तीर्थक्षेत्र तालुका येथील नागपंचमी यात्रा रद्द.

161

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी{ ता प्र}:-नागमंदिर बाबुळवाड़ा मित्र मंङळ ०दारे
दरवर्षीप्रमाणे बाबुळवाडा येथे नागपंचमीला यात्रा नागपंचमीनिमित्त आयोजित केली जात होती. ती यात्रा ही यावेळी कोरोना व्हायरस आजार पसरू नये. तसेच ग्रामीण भागात या आजाराने थैमान घातल्याने रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे तसेच नागरिकांची गर्दी होणार असल्याने यावर्षीची नागपंचमीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय नागमंदिर बाबुळवाडा मित्र मंडळाने घेतला असल्याने यावर्षी २५ जुलै रोजी भरणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर भाविक भक्तांनी या यात्रा स्थळावर येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तर यात्रास्थळी भाविक भक्तांना मनाई करण्यात आली आहे.पाराशिवनी तालुका तिल् सर्व मोठे नागमंदीर जेथे जास्त गर्दी असते असे बाबूळवाडा या पावन नगरीतील प्रत्येकवर्षी नागपंचमीनिमित्त होणार्‍या भव्य यात्रेचे आयोजन यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेले आहे. तसेच मोठय़ा संख्येने नाग दर्शनास येणार्‍या भाविक भक्तांना नागमंदिर बाबुळवाडा मित्र मंडळातर्फे विनम्र विनंती करण्यात आली आहे की, कोणीही शनिवार, २५ जुलै रोजी नागमंदिर बाबूळवाडा येथे दर्शनास येऊ नये, असे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे