सिंदेवाही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बंद पण शालेय शिक्षण सुरूच.शिक्षण आपल्या दारी संकल्पना पुर्णत्वास नेण्याची शिक्षक व ग्रामस्थांनी स्विकारली जबाबदारी.

0
116

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंढरी (कोके.) येथील उपक्रमशील शिक्षक श्री. विनोद लांडगे यांनी शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर, सहाय्यक शिक्षक मानकर सर, वाटगूरे मॅडम, खोब्रागडे मॅडम, फुलसे मॅडम, कुसराम मॅडम यांचे सहयोगाने *शाळा बंद पण शिक्षण सुरू* हा उपक्रम सुरू करण्याचे ठरविले असून, २५ जुन २०२० पासुन शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली. मात्र कोविद-१९ चे लॉकडाऊन मुळे शासनाचे आदेशानुसार ‌शाळा सुरू झाल्या नसल्यानेव विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी *शिक्षण आपल्या दारी* या संकल्पनेला मूर्त रूप देत शाळा व्यवस्थापन समितीने व गावातील पालकांनी तसा ठराव पारित केला. व विद्यार्थ्यांना त्यांचे घरीच शिक्षक आणि शिक्षकमित्र यांचे मार्गदर्शनाखाली गृहपाठ घेण्याचे ठरविले आहे. यासाठी गावातील तरुण मंडळी तयार झाले असून, अॉनलाईन शिक्षण ग्रामीण भागात अश्यक्य असल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षक मित्र यांचे सहकार्याने हा अभिनव उपक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंढरी (कोके.) येथे सुरू करण्यात आला आहे. याच उपक्रमांतर्गत शाळा, गावातील सर्व दुकाने, सहकारी संस्थांचे कार्यालये, रोडवरील घरांच्या भिंती यांच्यावरती शालेय शिक्षणातील महत्वाच्या बाबी, भिंतीचित्रफलक , चार्टद्वारे बोलक्या करून देण्यासाठी गावातील दुकानदार, मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकान, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, गावकरी मंडळी, देवस्थान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समिती, व शिक्षक यांचे सहकार्याने भिंती बोलक्या करण्याचे ठरविले आहे.