बहुजन समाज पार्टी तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र राजूर ला सॅनिटीझर मशीन भेट

 

वणी : परशुराम पोटे

कोरोना कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वोत्तपरी कार्यरत आहे,आपले सुद्धा काही योगदान म्हणून बहुजन समाज पार्टी तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र राजूर ला सॅनिटायझर मशीन भेट देण्यात आली.
यावेळी बसपा नेते विजय वानखेडे, माजी पं. स.सदस्य अशोक वानखेडे, वणी विधानसभा अध्यक्ष प्रवीण खानझोडे, माजी पं. स. उपसभापती वृषालीताई खानझोडे, गट विकास अधिकारी राजेश गायनार , वैद्यकीय अधिकारी डॉ.चिखलीकर, पोलीस पाटील सरोज मून, राधेश्याम सूर्यवंशी, भीमराव जंगले, सोमेश्वर जांगडे, सुलोचना वानखेडे, विकेश जंगले, पंकज कांबळे, महेश लिपटे हे प्रामुख्याने उपस्थित होते.