जी.ई.एस. ज्यू. कॉलेज नवेझरी चा निकाल १००%

0
113

 

बिंबिसार शहारे/अतित डोंगरे

तिरोडा : जी.ई.एस. ज्यू. कॉलेज कला व विज्ञान नवेझरी महाविद्यालयातील इयत्ता १२ वि च्या निकालात विज्ञान शाखेतून चंदन सेवकराम भगत याने ८५.२३% गुण पटकावून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.तर कु.खुशी संतोष शहारे हिने ८२% घेत द्वितीय क्रमांक तर अतुल फत्तु रहांगडाले ह्याने ८०.९२% गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.. विज्ञान शाखेच्या निकालाची टक्केवारी १००% आहे तर कला शाखेची ९७.१३% अशी आहे. विज्ञान शाखेत एकूण१०७ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. यापैकी १०७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. ०८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत , ८६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत , १३ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. तर कला शाखेत ,प्रथम श्रेणीने ३८,द्वितीय श्रेणीत २९ तर पास श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत..
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य, आईवडील, ज्युनिअर कॉलेज चे प्राध्यापक, सर्व शिक्षक वृंद यांना दिले आहे. महाविद्यालयाचे वतीने सर्व विद्यार्थी यांचे अभिनंदन व कौतुक व्यक्त केले आहे.