धक्कादायक बातमी, विद्यानगरी मधिल विधुत पोला अचानक कोसळले,जिवीत हाणी टळली, विधुत विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

193

 

वणी : परशुराम पोटे

शहरानजिक असलेल्या विद्यानगरीत आज अचानक विद्युत पोल कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र या घटनेत कोनतीही जिवीत हानी झाली नसुन खेळत असलेले चिमुकले मुले बाल बाल बचावले आहे.
विद्यानगरी वसाहत ही नांदेपेरा मार्गावर ,मागील 25 वर्षा पासुन अस्तित्वात आहे. या नगरीत मोठ्या प्रमाणात शिक्षकांचे वास्तव्य आहे. विद्यानगरी लगत असलेल्या काही घरांनकरीता लाईनची व्यवस्था करण्यासाठी मागील एक महिन्यात विद्युत पोल टाकून विद्युत प्रवाह सुरु करण्यात आला होता. परंतु आज दि.२३ जुलैला सायंकाळी 7 च्या दरम्यान अचानक विद्युत पोल सहीत जिवंत तार जमिनीवर कोसळले.
ही घटना ईतकी भयंकर होती की ,यामध्ये विद्यानगरी मधील नागरीक हादरुण गेले. एक महिन्या अगोदर केलेले काम निकृष्ठ दर्जाचे होते हे दिसुन आले असुन, या घटनेनेे विधुत विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
या घटनेत जिवित हानी झाली असती तर या घटनेची जवाबदारी कोणी घेतली असती?असा सवाल विद्यानगरी येथील नागरिक करीत आहे.
तसेच वणी ते मुकुटबन मार्गावर बर्याच ठिकाणी विद्युत पोल झुकले असुन कोसळण्याच्या स्थितीत आहे. याकडेही महावितरणाने लक्ष देण्याची गरज आहे.