नक्षल दमन विरोधी सप्ताह तसेच नौकरी व स्पर्धा परीक्षे संबंधित योग्य मार्गदर्शन

0
60

 

प्रतिनिधी
राहुल उके
दखल न्यूज भारत

गोठणगांव: दि. 23/07/20
गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिक्षक श्री. मंगेश शिंदे, अपर पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत ढोले, पो.स्टे. केशोरी चे ठाणेदार दिपक जाधव यांचे उपस्थितीत सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव येथे दिनांक 23/07/2020 रोजी “नक्षल दमन विरोधी सप्ताह” निमीत्ताने नक्षलग्रस्त भागातील युवकांना स्पर्धा परिक्षा, पोलीस सैन्य भरती बाबत मार्गदर्शन व श्री प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे कडुन पोलीस भरती करीता सराव करीत असलेल्या युवकांना टि-शर्ट, शुज व किट चे वाटप करण्यात आले.
श्री प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांनीउपस्थीत नवयुवकांना स्पर्धा परिक्षा विषयी मार्गदर्शन करुन नक्षल चळवळीकडे न जाता व मनात न्यनगंड न बाळगता प्रशासनात सहभागी होण्याचे व नोकरीच्या संधीबाबत महत्वपुर्ण मार्गदर्शन केले. सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव येथील पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण व वाचनालयाच्या माध्यमातुन कु.धनश्री अरुनराव भांडारकर रा.करांडली, राजेंद्र मांडवे रा.गंधारी यांची निवड एसएससी. मधुन सेन्ट्रल पोलीस करीता व मनिष अशोक बोरकर रा. गोठणगांव यांची एसबिआय बँक मध्ये ज्युनियर असोसीएट म्हणुन निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रमास पो.स्टे. केशोरी चे ठाणेदार दिपक जाधव सशस्त्र दुरक्षेत्रचे गोठणगांवचे प्रभारी अधिकारी पोउपनि.अशोक केंद्रे, मनोज उघडे, गोलवाल व सशस्त्र दुरक्षेत्राचे सर्व सहकारी कर्मचारी यांचे सहकार्याने सदरचे कार्यक्रम पार पाडलेे.