चामोर्शी येथे शिवसेना कार्यकर्त्याकडून उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांचा जाहीर निषेध

123

 

राज्यसभेमध्ये शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमान केल्या प्रसंगी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा जाहीर निषेध..शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांच्या नेतृत्वात अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे उपस्थित शिवसेनेच्या वतीने चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेट समोरील मुख्य रस्त्यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या संदर्भात घोषणा देत त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला .त्यांनी राज्यसभेवर मध्ये शपथ घेताना जो प्रकार घडला त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला प्रसंगी हा जाहीर निषेध केले असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी व्यक्त केले .यावेळी स्वतः शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार,जिल्हा संघटक विलास कोडाप, उपजिल्हा संघटक विलासभाऊ ठोंबरे, उपजिल्हाप्रमुख धर्मराज राॅय, शिवसेना तालुका प्रमुख शहर अमित यासलवार,तालुका प्रमुख ग्रामीण पप्पी पठाण,शहर प्रमुख बंडूजी नैताम, माजी जि. प. सदस्य दिवाकर भोयर ,उपशहर प्रमुख घनश्याम कोलते ,ज्येष्ठ शिवसैनिक वासुदेव वरवाडे, युवानेते महेंद्र सुल्वावार, आदी शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.