नवीन सिंचन तलाव जांभुळखेडा वासियासाठी वरदान जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते झाले जलपुजन

120

कुरखेडा/राकेश चव्हान प्र
वन कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या जांभुळखेडा येथील सिंचन तलावासाठी गावकऱ्यांनी उभारलेल्या लढ्याला यश आले असून तलावासोबत कॅनलचे काम पूर्ण होऊन आज जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते जल पूजना नंतर पाणी सोडण्यात आल्याने जांभुळखेडा वासीयांनी आनंद व्यक्त केला यावेळी आमदार कृष्णा गजबे,माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल,उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे,तहसीलदार सोमनाथ माळी, गट विकास अधिकारी अनिता तेलंग, जिप लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता भुमेश दमाहे, उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे, वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के,सरपंच शिवाजी राऊत व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते
जांभुळखेडा गावाच्या पूर्वेस दोन किमी अंतरावर ४० हेक्टर जागेत असलेला सिंचन तलाव वन कायद्याच्या कचाट्यात सापडला दरम्यान १९८५च्या पावसाळ्यात या तलावाची पाळ फुटल्याने तलावाचे अतोनात नुकसान झाआणि शासनाचे या तलावाकडे पार दुर्लक्ष झाले मात्र जांभुळखेडा येथील नागरिकांनी तलावाची सिंचन क्षमता आणि पाण्याचे महत्त्व ओळखून तलावासाठी लढा उभारला या लढ्याला साथ दिली येथील माजी शिवसेना प्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल यांच्या प्रयत्नाने २०१६ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी नायक व वनसंरक्षक होसिंग यांनी तलावाच्या कॅनल साठी एक हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आणि सिंचन तलाव पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला मात्र अडचण होती तलावाची फुटलेल्या पाळीमुळे तलावाचे झालेलं नुकसान भरपाईची दुरुस्तीसाठी लागणाऱ्या करोडो रुपयाच्या शासकीय निधीची आवश्यकता दूर केली येथील लघुसिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे यांनी सदर काम मनरेगाच्या माध्यमातून पूर्ण करून१४हजार मनुष्यबळ दिवस इतका रोजगार उपलब्ध करून दिला तलावाच्या कॅनलची लांबी २१००मीटर असून या तलावाच्या पाण्यामुळे यावर्षीच्या ३४४ एकरातील खरीप हंगामासाठी सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांसाठी सिंचन तलाव वरदान ठरणार असल्याने जांभुळखेडा वासीयांनी आनंद व्यक्त केला