Home गडचिरोली मोटारपंप मधील विद्यूतचा धक्का बसत शेतकर्याचा मृत्यु (कुंभीटोला (पूराडा) येथील घटणा)

मोटारपंप मधील विद्यूतचा धक्का बसत शेतकर्याचा मृत्यु (कुंभीटोला (पूराडा) येथील घटणा)

211

कूरखेडा/राकेश चव्हान प्र
शेतात रोवणीचा कामासाठी नदीकाठावरील विहीरीत असलेला मोटारपंप सूरू करताना विद्यूतचा धक्का बसत शेतकर्याचा मृत्यु झाल्याची घटणा कूंभीटोला (पूराडा) येथे घडली
उमेश कांशीराम काटेंगे (वय ३०) असे मृतक शेतकर्याचे नाव आहे गावाचा शेजारून वाहणार्या सतीनदीचा काठावर मृतकाचा कूटूंबियांची शेती आहे रोवणीचे काम सूरू असल्याने व शेतात पूरेशा प्रमाणात पाणी नसल्याने मृतक हा नदी पात्रात असलेल्या विहीरीत असलेला मोटारपंप सूरू करण्याकरीता गेला होता यावेळी त्याचा हाताचा स्पर्श मोटारीला झाला व मोटारीला करंट असल्याने त्याला जबर धक्का बसत तो तिथेच बेशूद्ध पडला त्याला लगेच सहकार्यानी येथील उपजिल्हा रूग्नालयात हलविले मात्र वाटेतच त्याचा मृत्यु झाला मृतक हा विवाहित असून त्याला तिन मूली आहेत पत्नीचा नावे दोन एकर शेती आहे घरचा कर्त्या पूरषाचा अकाली निधनाने त्याचे कूटूंबिय पोरके झाले आहेत

Previous articleभाजप सरकारचा व व्यंकय्या नायडू यांचा जिल्हा शिवसेने तर्फे बल्लारपुर येथे करण्यात आला जाहीर निषेध
Next articleनवीन सिंचन तलाव जांभुळखेडा वासियासाठी वरदान जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते झाले जलपुजन