भाजप सरकारचा व व्यंकय्या नायडू यांचा जिल्हा शिवसेने तर्फे बल्लारपुर येथे करण्यात आला जाहीर निषेध

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
खासदार उदयन राजे भोसले यांनी राज्यसभा सदस्याची शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी असा उल्लेख केला त्यावर ‘हे तुमचे घर नाही हे माझे चेम्बर आहे इथे बाकीच्या घोषणा चालणार नाहीत. तुम्ही नवीन आहात पुढच्या वेळी लक्षात ठेवा. असे छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे यांच्या बद्दल स्पष्ट खोटी भावना दाखवणारे भाजप सरकार व भाजप पक्षाचे व्यंकय्या नायडू यांचा निषेध जाहीर निषेध शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वार समोर भाजप सरकार व व्यंकय्या नायडू यांचा निषेध असो अशा घोषणा व नारेबाजी करीत निषेध करण्यात आला यावेळी सिक्की यादव उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक बल्लारपूर, प्रमोद पाटील शहरप्रमुख चंद्रपूर, प्रकाश पाठक तालुकाप्रमुख बल्लारपूर ,संतोष नरुले तालुकाप्रमुख चंद्रपूर ,सरिता ताई कुडे माजी जिल्हा परिषद सदस्य ,अशोक चिरखरे उपशहरप्रमुख चंद्रपूर ,विक्रांत सहारे ,शाहरुख शेख