विश्वकर्मा समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे प्रा.नागोराव पांचाळ यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त करा : दिलीप दीक्षित

283

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात एक होनहार ओबीसी सामाजिक कार्यकर्ते असलेले प्रा.नागोराव काशिनाथ पांचाळ यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांनी ओबीसी प्रवर्गासाठी केलेल्या कार्याची पावती म्हणून विधानपरिषद आमदार सदस्य पद बहाल करावे. नवयुगाचे युवा नेते, *ओबीसी समाज प्रवर्ग तथा विश्वकर्मा समाजाचे गाढे अभ्यासक युवकांचे प्रेरणास्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असलेले प्रा.श्री नागोराव काशिनाथ पांचाळ* अतिशय अभ्यासू व गरीबांचे कैवारी म्हणून ओळखले जातात. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी, आर्थिक पाठबळ नसतांना देखील लोककल्याणकारी काम केले आहेत
आजपर्यंत केलेल कार्य १) मे २०१८ रोजी पुणे येथून ओबीसी ब्रिगेडचे माध्यमातून *संपूर्ण महाराष्ट्रभर संविधानिक न्याय यात्रा* काढली. ३५ जिल्ह्यातून प्रवास करत ३५ सभांच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गाच्या समस्या बाबत मार्गदर्शन करत मुंबई येथे सांगता. २) *न्या.रोहिणी आयोग* यांच्याशी वारंवार १५ मिटींगच्या माध्यमातून चर्चा करून अभ्यासपूर्ण मायक्रो ओबीसी प्रवर्ग समाजाचा ४० पानी अहवाल सादर *३) ओबीसी ब्रिगेड मार्फत ओबीसी प्रवर्गाची डीजीटल जनगणना सुरु केली.* ४) दैनिक सकाळ, दैनिक लोकमत, ओबीसी प्रहार, विश्वकर्मा मासिक व इतर साप्ताहिक माध्यमातून निरंतर *संविधानिक प्रबोधनपर लिखाण* ५) सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासनाकडे निरंतर पाठपुरावा ६) *विश्वकर्मा समाज जन जागृती अभियान* अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात प्रभू विश्वकर्मा रथयात्रा आयोजन केले. रथयात्रा दरम्यान १७३ तालुके, ५६ शहर, २३ जिल्हे आणि ५८०० कि.मी.प्रवास, १९५ सभा घेऊन विश्वकर्मा वंशीय समाज संघटन, महाराष्ट्र राज्य ची स्थापना केली ७) विश्वकर्मा वंशीय समाजाच्या *आर्थिक विकास योजने* अंतर्गत *VVSS NIDHI LTD.* ही आर्थिक संस्था स्थापन केली. ८) विश्वकर्मा वंशीय समाज पाचही कामगार समाज बांधवांच्या व ओबीसी समाज बांधवांच्या विकासासाठी निरंतर कार्यरत राहण्याचा संकल्प. ९) कोविड-१९ व्हायरस संक्रमण प्रादुर्भाव जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायावर आलेल्या गडांतरवर महाराष्ट्रातील उद्योजक व नवउद्योजक यांना MSME (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम) च्या माध्यमातून विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा.
ओबीसी ब्रिगेड व विश्वकर्मा वंशीय समाज संघटन माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात समाज जनजागृती व विविध उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील विश्वकर्मा समाजाचे एकमेव नेतृत्व प्रा.नागोराव काशिनाथ पांचाळ यांना विधानपरिषद सदस्य संधी मिळावी अशी संपूर्ण मायक्रो ओबीसी प्रवर्ग व विश्वकर्मा वंशीय समाज ( सुतार, लोहार, सोनार, तांबट,पाथरवट) यांची मागणी आहे.