ग्रा प गोंडेगाव तर्फे आंगणवाड़ी सेविका, आशा वर्करना सुरक्षा साहित्य वाटप

181

 

कमलसिहं यादव
पाराशीवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान (ताः प्र): – पारशिवनी तालुका तील् गोंडेगाव ग्राम पंचायत कडुन कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गावात आंगणवाडी सेविका व आशा वर्कर महत्वाचे कार्य करित असल्याने ग्राम पंचायत गोंडेगाव व्दारे ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच नितेश राऊत, उपसरपंच सुभाष डोकरीमारे यांच्या हस्ते ग्राम पंचायत हद्दीतील कार्यरत तीन अंगणवाडी सेविका व दोन आशा वर्कर असे पाच ही कर्मचारी यांना १)सनकोट,२) हॅंडग्लोब, ३)टेम्परेचर गण , ४)पल्स ऑक्सिमीटर,५) सेनेटाईजर, ५)मास्क आदी सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रा प सदस्य सौ. ललीता पहाडे,सौ.निर्मला सरवरे, मोरेश्वर शिंगणे, आकाश कोडवते, सौ यशोदा शेंदरे, सौ रेखा काळे, सौ पुजा रासेगावकर, सौ आशिमा वासनिक,सुनिल धुरिया, कुणाल मधुमटके व कर्मचारी संजय मेश्राम उपस्थित होते.