श्रीराम मंदिरात हिंदुतील सर्व समाजाला पूजऱ्याचे प्रतिनिधित्व द्या.. एकाच समाजाचे ट्रष्ट्री आणि पुजारी बनवून इतर हिंदूंचा अपमान करू नये श्री गुरुदेव सेनेची प्रधानमंत्र्याकडे मागणी

0
83

 

प्रतिनिधी/बिंबिसार शहारे

वणी दि.२३: प्रभुरामचंद्र हे तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असून या मंदिर निर्माण ट्रष्ट मध्ये आणि मंदिरातील पूजऱ्याचे प्रतिनिधित्व देखील हिंदू धर्मातील सर्व समाजातील सर्वांना देण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन श्री गुरुदेव सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत देश्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कडे निवेदनात मार्फत केली आहे.
अनेक वर्षा पासून हिंदूंचे दैवत असलेले श्रीरामाचे मंदिर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निर्माण झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकार मध्ये होत असून मोदी यांचे सर्वत्र कौतुक ही केल्या जात आहे. सन १९९० मध्ये मंदिर निर्मानसाठी काढलेल्या रथ यात्रेमध्ये कार सेवक म्हणून हिंदू धर्मातील obc, sc, st, vjnt, dnt मराठा व इतर सर्व जातीचे तरुण व रामभक्त सहभागी झाले होते. यावेळी घडलेल्या दंगलीत ६७ हजार कार सेवक शहीद झाले होते. त्या शाहिदांचे बलिदान म्हणून आज अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्री राम मंदिराचा प्रश्न मोदी सरकार ने मार्गी लावला आहे. त्यामुळे या मंदिर निर्माण ट्रष्ट मध्ये व मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या सेवेत पुजारी म्हणून हिंदू धर्मातील सर्व जातींच्या लोकांचा सहभाग असायला पाहिजे. यात जर हिंदुतील एकाच समाजातील लोक सहभागी असेल तर हा इतर हिंदू समाजाचा घोर अपमान आहे. असे कृत्य देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून घडू नये साठी हिंदुतील सर्व समाजाच्या लोकांचे प्रतिनिधित्व समानतेच्या आधारावर सन्मानाने या प्रस्तावित श्री राम मंदिरात असावे व सर्वांना श्री रामाची सेवा करण्याची संधी मिळावी अश्या मागणीचे श्री गुरुदेव सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर मुख्य संघटक मिलिंद पाटील , पुंडलीककाका मोहितकर, निखिल झाडे आदीं उपस्थित होते.
प्रभू श्रीराम हे तमाम हिंदूंचे दैवत आहे त्यामुळे त्या मंदिरातही सर्व हिंदूंचे प्रतिनिधित्व सन्मानाने समानतेच्या आधारावर असले पाहिजे हिंदुतील एका विशिष्ट समाजाचेच जर लोक या ट्रष्टीत आणि मंदिरातील पुजारी म्हणून नेमण्यात येत असेल तर मंदिर निर्माण साठी झालेल्या संघर्षातील शहिद झालेल्या ६७ हजार बाराबलुतेदार हिंदुचा हा अपमान सरकारने करू नये यासाठी हा तमाम हिंदूंच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असून देश्याच्या प्रधानमंत्र्यांनी याकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे.
श्री गुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केले आहे.