गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या ११ जवानांना वेगवर्धित पदोन्नती पोलिस अधिकक्ष शैलेश बलकवडे यांच्याकडून जवानांचे अभिंनंदन

0
203

 

संपादिका …रोशनी बैस

गडचिरोली : नक्षलविरोधी उत्कृष्ट व दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे वेगवर्धित पदोन्नती बहाल करण्यात येते. त्यानुसार काल २२ जुलै रोजी विषेश पोलिस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान, नागपूर यांच्या कार्यालयामार्फत नक्षलविरोधात उत्कृष्ट कामगिरीची नोंद करणाऱ्या ११ जवानांना वेगवर्धीत पदोन्नती बहाल करण्यात आली.
वेगवर्धीत पदोन्नती बहाल करण्यात आलेल्या जवानांमध्येय पोहवा प्रभुदास पांडूरंग दुग्गा यांची सहाय्यक फौजदार पदी, नापोशि संतोष विजय पोटावी, नापोशि बापू रामु गोटा, नापोशी निलेश्वर देवाजी पदा, नापोशि बालाजी जयराम कन्नाके यांची पोलिस हवालदार पदी तर पोशि अविनाश कवडो, पोशि मोगलशाह मडावी, पोशि श्रीनिवास सत्यनारायण संगोजी, पोशि अशोक कुलसंगे, पोशि रूषी डोलु विडपी, पोशि अशोक पांडु मज्जी यांची पोलिस नाईक पदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे.
वेगवर्धीत पदोन्नती प्राप्त सर्व जवानांचे जिल्हा पोलिस अधिक्षक शैलश बलकवडे यांनी अभिनंदन केले आहे.