अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या कार्याचे गृहमंत्र्यांनी केले कौतुक

198

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्निल सरकटे

अकोट ग्रामीण पोलिसांनी सामाजिक दायित्व जपत बिकट परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका परिचारिकेला घरपोच पोलीस वाहनांनी सुखरुप सोडवले.अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी दाखवलेली माणुसकी व कार्यतत्परता कौतुकास्पद असल्याचे विशेष Tweet महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेब,विधानपरिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी,अकोला पोलीस विभाग यांनी केले.खऱ्या अर्थाने पोलीस विभाग अखंडपणे काम करून माणुसकी जपत करीत असलेले कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.