कोरोना रुग्णांचा आकडा ३०० च्या जवळ; नागरिकांच्या गैरवर्तनामुळे प्रशासनाच्या हाताबाहेर जात आहे कोरोना संकट

253

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कामठी /नागपुर : 23 जुलै 2020
नागपुर जिल्ह्यातील कामठी सध्या कोरोना हाँट स्पाँट बनले असुन येथील कोरोना संकट कामठीवासियांच्या गैरवर्तनामुळे हाताबाहेर जाते की काय? असे वाटत आहे. नागरिक स्वतः लाँक डाऊन चे पालन, मास्क, सेनिटायजर चा वापर करीत नाहीत फिजिकल डिस्टेंसिंग पाळत नाहीत त्यामुळे आज सर्वाधिक सुरक्षित समजली जाणारी कामठी आज सर्वात असुरक्षित होत चालली आहे.
आज दिवसभरात झालेल्या कोरोना चाचणी तपासणी अहवालात एकूण 40 रुग्ण कोरोना पॉजीटीव्ह आढळले.यानुसार आजपावेतो एकूण कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या ही एकूण 298 आहे. त्यातील 70 रुग्णांनी कोरोनावर मात करून उपचार घेऊन बरे झाले आहेत. यानुसार एकूण 228 रुग्ण सध्यस्थीतीत उपचार घेत आहेत. यातील 89 अहवाल अजूनही प्रलंबित आहेत. तर आजपावेतो कोरिणाबधित मृत्यू संख्या ही 06 आहे.
आज 40 कोरोना पॉजीटिव्ह रुग्णामध्ये नया बाजार 07, छत्रपती नगर 06, तुंमडीपुरा 01, जयभीम चौक 09, नया गोदाम 01, येरखेडा 01,वारीसपुरा 07, पेरकीपुरा 01, हरदास नगर 02, गुंमथळा 01, उंटखाना 01,कोळसाटाल 02, कुंभारे कॉलोनी 01 रुग्णाचा समावेश आहे
आज 23 जुलै रोजी कामठी मध्ये रात्री 7: 30 पर्यंत एकुण पाजिटिव 40 पेशंट मिळाले आहेत. कामठी मध्ये आजपर्यंत चा हा एक रेकार्ड आहे कोरोना पेशंट इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळाले आहेत. आता याबाबतीत येथील सामाजिक संगठन तसेच राजकीय पक्षाने आता याबाबत गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.
काल 258 + आज 40 कामठी मध्ये एकुण पाजिटिव संख्या पहुची 300 च्या जवळ पोहोचली आहे. पण लोक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी नागपुर व पोलीस आयुक्त यांनी कर्फ्यु घोषित करण्याची स्थानिक नेते लवकरच मागणी पण करु शकतात, त्याशिवाय कामठी कर सुधरणे शक्य नाहीत.