Home नागपूर कन्हान ला काल ११ व आज ९ रूग्ण आढळुन कोरोना विस्फोट. ...

कन्हान ला काल ११ व आज ९ रूग्ण आढळुन कोरोना विस्फोट.  पाराशिवनी एकुण ५२ रूग्ण, दोन मुत्यु.

367

 

कमलसिह यादव
पारारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी(ता प्र): – कामठीवरून पाराशिवनी /कन्हान ला शिरकाव झाला तरी येथील प्रशासन जागे न झाल्याने आठव्या दिवसी रात्री एका भाजीपाला वाल्याचा मुत्यु होऊन आठव्या दिवसी एकुण २८ संख्या, नऊ व्या दिवसी ऑटोवाला व निरंतर सर्वेती ल १ असे दोन रूग्ण आढळुन ३० संख्या झाली. काल (दि.२२) ला कांद्री येथे ७५ लोकांच्या वैद्यकीय तपासणीत भाजीपाला वाल्याच्या संपर्कातील पटेलनगर कन्हानचे ९ व कन्हान १ आणि कांद्रीची १ महिला असे ११ रूग्ण व आज(दि २३जुलै) ला पुन्हा७५लोकाची वैद्यकिय तपासणीत ९रुग्ण भाजी वाल्याच संपर्कातुन .आढळुन आल्याने कन्हान ला कोरोना रूग्णाचा विस्फोट होत एकुण ५० रूग्ण संख्या होऊन एका भाजीपाला वाल्याचा मुत्यु झाला. यात कन्हान -२९, पिपरी – ५, कांद्री ग्रा पं – ८, टेकाडी कोळ सा खदान – ग्रा पं ७ व बोरडा(गणेशी) ग्रां पं -१,पालोरा ग्रा पं १ व पारशिवनी पोलिस स्टेशन कर्मचारी १ असे कन्हान शहर व तालुका ग्रामिण मध्ये एकुण ५२संख्या होत दोन२ मुत्यु झाल्याने कन्हान कोरोना विस्फोटक होत असल्याने ही वाढती साखळी तोडण्याकरिता कन्हान ला कमीत कमी १० दिवसाचा कडक जनता कर्फुची मागणी ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व विविध सामाजिक संघटना, संस्था आणि नागरिका व्दारे जोर धरू लागली आहे.
सर्दी, खोकला, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास नागरिकांनी कोरोना ची मोफत तपासणी मुकबधीर विद्यालय कांद्री येथे करून घ्यावी. डॉ प्रशांत वाघ
कोविड-१९ ची वैद्यकीय तपासणी १)मुकबधीर विद्यालय कांद्री २)महात्मा गाधी महा विद्यालय पारशिवनी येथे पाराशीवनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ, प्राथमिक आरोग्य केन्द्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉः योगेश चौधरी, सुरेंद्र गि-हे, अजय राऊत, गौरव भोयर, श्वेता मेश्राम, लॅब टेकनीशियन शारदा जोगळेकर आदी अथक परिश्रम करित आहे.

Previous articleगडचिरोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटना मध्ये तिघांचे मृत्यू
Next articleगडचिरोली जिल्हयात बारापैकी आकरा तालुके कोरोनामुक्तीच्या दिशेने गडचिरोली जिल्ह्यात 12 हजार कोरोना चाचण्या आकरा तालुक्यात 131 रूग्णांपैकी 108 कोरोनामुक्त, उरले फक्त 22 सक्रिय